राज्यातील ५ आय.ए.एस्. अधिकार्यांचे स्थानांतर !

सांगली, १६ एप्रिल (वार्ता.) – राज्यातील ५ आय.ए.एस्. (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकार्यांचे स्थानांतर करण्याचे आदेश लागू केले आहेत. यातील वरिष्ठ आय.ए.एस्. अधिकारी अस्तिककुमार पांडे यांची ‘एम्.एम्.आर्.डी.ए.’च्या सहआयुक्त पदावर, तर आर्.एस्. चव्हाण यांचे कर्मचारी राज्य विमा योजनेच्या आयुक्तपदी स्थानांतर केले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी सत्यम गांधी यांचे स्थानांतर केले आहे. ते यापूर्वी डहाणू येथे प्रकल्प अधिकारी तथा पालघरचे साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पहात होते. या पदावर आता यवतमाळ राळेगाव उपविभागातील साहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांची नियुक्ती झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांची हिंगोली जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे.