जोतिबा यात्रेतून एस्.टी. महामंडळास ३२ लाख ३९ सहस्र रुपयांचे उत्पन्न !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – जोतिबा यात्रेतून एस्.टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागास ३२ लाख ३९ सहस्र रुपयांचे उत्पन्न मिळाले. यात सर्वाधिक इचलकरंजी विभागास ४ लाख ९२ सहस्र रुपयांचे उत्पन्न मिळाले. भाविकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील १२ आगारांतून १९० अधिक गाड्या सोडण्यात आल्या. त्यांतून १ सहस्र ९५९ फेर्‍यांद्वारे ९० सहस्र प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. एस्.टी.चे अधिकारी, कर्मचारी यांच्या योग्य आणि सूक्ष्म नियोजनामुळेच हे उत्पन्न मिळाले, असे विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांनी सांगितले.