
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची नेहमीच रेलचेल असते. श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने कीर्तन, प्रवचन, भक्तीसांगितीक कार्यक्रम या माध्यमातून देशभरात धर्मध्वजाची पताका उंचावली आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी केले. सर्व स्वामीभक्तांनीही स्वामींच्या या पुण्यतिथी महोत्सवाच्या मंगल पर्वकाळात स्वामी दर्शनाचा लाभ घेऊन जीवन कृतार्थ करावे, असेही मनोगत केले.
या वेळी अक्कलकोटचे दिवाणी न्यायाधीश मुकुल कल्याणकर, अक्कलकोट न्यायालयाचे स्वप्नील मोरे, धनंजय कलमदाने, अविनाश सुरवसे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, विपुल जाधव, महेश मस्कले इत्यादी उपस्थित होते. मंदिर समितीकडुन न्यायमूर्ती वृषाली जोशी यांचा सन्मान करण्यात आला.