महाराष्ट्रातील लहान मुलांकडून ‘इंटरनेट’चा सर्वाधिक वापर ! – ‘क्राय’ संस्था

  • ‘क्राय’ संस्थेच्या सर्वेक्षणातून उघड

  • चॅट (संभाषण) सुविधेच्या माध्यमातून ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींची फसवणूक झाल्याचेही उघड !

मुंबई – महाराष्ट्रातील १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांकडून इंटरनेटचा सर्वाधिक वापर होत आहे, हे बाल अधिकारांसाठी लढणार्‍या ‘क्राय’ या संस्थेच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. (आजच्या युगात तंज्ञत्रान जरी जीवनाचा अविभाज्य भाग झालेले असले, तरी मुले त्यात वहावत जाऊन आयुष्याची हानी करून घेत नाहीत ना, हेही पहायला हवे ! – संपादक) चॅट (संभाषण) सुविधेच्या माध्यमातून ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींची फसवणूक झाल्याचेही या सर्वेक्षणात दिसून आले. या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रानंतर बंगाल, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांचा क्रमांक लागतो.

संपादकीय भूमिका 

पालकांनी त्यांच्या मुलांकडे वेळीच लक्ष ठेवून त्यांना सतर्क करायला हवे !