मालवण : भारतीय नौसेनेचा नौदल दिन डिसेंबरमध्ये मालवण येथे साजरा होणार आहे. यानिमित्त ‘राजकोट’ किल्ल्यावर नौसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि तटबंदी उभारणी यांचे काम युद्धपातळीवर चालू आहे. नौदल दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन आणि त्या अनुषंगाने चालू असलेली कामे यांचा आढावा घेण्यासाठी १६ नोव्हेंबर या दिवशी नौसेनेचे पश्चिम विभाग प्रमुख रिअर ऍडमिरल दिनेश त्रिपाठी, महसूल खात्याचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणपूरकर आणि कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक प्रवीण पवार यांनी येथे भेट दिली.
या वेळी त्यांनी ‘राजकोट’ किल्ल्यावर चालू असलेले काम, सिंधुदुर्ग किल्ला, मालवण बोर्डिंग ग्राउंड आणि तारकर्ली येथे होणार्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन सिद्धतेचा आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रांताधिकारी कळुसे, तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा –
♦ सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणारा नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य व्हावा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र
https://sanatanprabhat.org/marathi/713622.html