कोरोनाविषयक चाचण्यांच्या दराविषयी अधिसूचना लागू

कोरोनासंदर्भातील वैद्यकीय चाचण्यांचे दर शासनाने अधिसूचनेद्वारे घोषित केले आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयांसाठी हे दर समान असतील. पूर्ण स्वयंचलित ‘आर्टी-पीसीआर्’ चाचणीसाठी २ सहस्र ४३० रुपये आकारले जातील.

नूतनीकरण केलेले आयनॉक्स मल्टीप्लेक्स आणि गोवा मनोरंजन संस्थेचा लोगो यांचे आज उद्घाटन

गोवा मनोरंजन संस्थेचे नूतनीकरण केलेले आयनॉक्स मल्टीप्लेक्स आणि गोवा मनोरंजन संस्थेचा लोगो यांचे उद्घाटन ११ जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता संस्थेच्या संकुलात राज्याचे मुख्यमंत्री तथा गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

पेडणे येथे बैलांच्या झुंजी आयोजित केल्याप्रकरणी गुन्हा नोंद, दोघांना अटक

तालुक्यातील दांडोवाडो, मांद्रे येथे बैलांच्या झुंजी आयोजित केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

कर्नाटकमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या स्वजातीतील पुजार्‍याशी विवाह करणार्‍या ब्राह्मण वधूला मिळणार ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य

‘आता धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी मुसलमान महिलांनाही अशा प्रकारचे साहाय्य द्यावे’, अशी मागणी तथाकथित निधर्मी राजकीय पक्ष, संघटनांनी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

धर्माचा अधिकार जगण्याच्या अधिकारापेक्षा मोठा नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

काही नियमावलींचे पालन करायला सांगून आता देशभरातील मंदिरे भक्तांसाठी उघडली जात आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात काही नियम आणि अटी घालून प्राचीन श्रीरंगम् मंदिरातील उत्सव चालू करण्यासाठी तमिळनाडूतील अण्णाद्रमुक सरकारने प्रयत्न करायला हवेत.

केंद्र सरकार गायीच्या उपयुक्ततेची माहिती देण्यासाठी प्रथमच राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेणार !

गायीचे दूध, गोमूत्र, शेण आदी गोष्टी मानवाला अत्यंत उपयुक्त आहेत; मात्र गायीचे कित्येक उपयोग आपल्याला आजही ठाऊक नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आता ‘राष्ट्रीय कामधेनू आयोगा’कडून राष्ट्रीय पातळीवर एक परीक्षा घेतली जाणार आहे.

धान्य खरेदीसाठी १ लाख बारदाने शासनाने पुरवावीत ! – सतीश सावंत

वर्ष २०२०-२१ च्या धान्य खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला १ लाख बारदानांची (पोत्यांची) आवश्यकता आहे. शासनाने ही बारदाने पुरवावीत, अशी मागणी राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे.

गोवंशियांचे मांस घेऊन जाणार्‍या २ धर्मांधांवर गुन्हा नोंद

पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथे गोवंशियांची अवैधपणे कत्तल करून ३ सहस्र ५०० किलो मांस वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध टेम्पोचालक सुफियान अन्सारी आणि अश्फाक मोहम्मद यांना कह्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर यानिमित्ताने फटाक्यांसंबंधी सूचना प्रसिद्ध करण्याविषयी धर्माभिमानी अधिववक्त्यांचे गृहमंत्रालय अन् बंगालचे मुख्यमंत्री यांना पत्र

ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर या दिवशी लावण्यात येणार्‍या फटाक्यांसंबंधी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्याविषयी हुगळी येथील धर्माभिमानी अधिवक्ता गोराचंद मल्लिक यांनी केंद्रीय गृहमंत्रालय अन् बंगालचे मुख्यमंत्री यांना ई-मेलच्या माध्यमातून निवेदन पाठवले.

बदायू (उत्तरप्रदेश) येथे अंगणवाडी सेविकेवर बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !