मंगल भवन अमंगल हारी…
२१ दिवस घरी बसून काय करायचे?, हा प्रश्न सर्वांसमोर असतांना कोणी भल्या माणसाने ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका दाखवण्याची शासनाकडे विनंती केली अन् ती मान्यही झाली.
२१ दिवस घरी बसून काय करायचे?, हा प्रश्न सर्वांसमोर असतांना कोणी भल्या माणसाने ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका दाखवण्याची शासनाकडे विनंती केली अन् ती मान्यही झाली.
कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आल्याने मजुरी करणार्यांचा आणि काम गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना बिहार शासन प्रत्येकी १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अनेक वैद्यकीय कर्मचारी रात्रं-दिवस झटत आहेत. अशा कर्मचार्यांना साहाय्य म्हणून आणि खाण्या-पिण्याची सोय व्हावी, यासाठी शीख समाजाने ३० सहस्र वैद्यकीय कर्मचार्यांसाठी लंगर (अन्नदान) म्हणून खाद्यपदार्थांची पाकिटे सिद्ध केली आहेत.
सध्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर धुमाकूळ घातला आहे. नागरिक एकीकडे काळजी घेत आहेत, तर दुसरीकडे लोकांमधील स्वार्थी वृत्ती, निष्काळजीपणा दिसून येत आहे. असाच प्रकार आता सातारा शहरात पहायला मिळत आहे.
जनहो, स्वयंशिस्त पाळा ! पोलीस-प्रशासनाचा वेळ छोट्या छोट्या गोष्टींसाठी वाया घालवू नका !
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कर्तव्य बजावणारे पोलीस, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरील आक्रमणाच्या घटना कदापि सहन केल्या जाणार नाहीत. अशी आक्रमणे करणार्यांवर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाईल
नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या हेतूंनी येथील जिल्हाधिकार्यांनी इंधन पुरवठ्यावर निर्बंध आणले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने खासगी वाहने वापरणार्यांची संख्या अधिक आहे.
कोरोना इतक्या झपाट्याने पसरतो आहे की, त्याच्या विरोधात संरक्षक नीती न वापरता आपण आक्रमक नीती वापरायला हवी. कोरोनाला हरवता येऊ शकते; पण त्याच्याशी लढण्यासाठी फूटबॉल खेळाच्या सामन्याला जशी नीती वापरतो, तशी रणनीती वापरावी लागेल
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा एक भाग म्हणून मुद्रित माध्यमांच्या वितरकांनी त्यांचे वितरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने गुढीपाडव्यापासून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुद्रित माध्यमे बंद करण्यात आली आहेत.
कोरोनाचे शहरातील पहिले रुग्ण ठरलेल्या दांपत्याची दुसरी चाचणीही ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना रुग्णालयातून २५ मार्चला ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ९ मार्चला नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले होते.