कोरोनाविषयक चाचण्यांच्या दराविषयी अधिसूचना लागू

पणजी, १० जानेवारी (वार्ता.)  – कोरोनासंदर्भातील वैद्यकीय चाचण्यांचे दर शासनाने अधिसूचनेद्वारे घोषित केले आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयांसाठी हे दर समान असतील. पूर्ण स्वयंचलित ‘आर्टी-पीसीआर्’ चाचणीसाठी २ सहस्र ४३० रुपये आकारले जातील. ‘ट्रूनेट’ वापरून केलेल्या ‘आर्टी-पीसीआर्’ चाचणीसाठी १ सहस्र ४०० रुपये आकारले जातील. ‘कन्व्हेंशिअल आर्टी-पीसीआर्’ चाचणीसाठी १ सहस्र १८८ रुपये आणि ‘इम्युन क्रोमेटोग्राफी’ वापरून केलेल्या ‘रॅपीड अँटीजेन’ चाचणीसाठी ५८० रुपये आकारण्यात येतील. चाचणीसाठी नमुना पाठवणे आणि इतर शुल्कांचा या दरांमध्ये समावेश असेल.