श्री दुर्गादौडीचा आजचा दुसरा दिवस !
सांगली, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – मनात श्रद्धा नसलेला श्रद्धाहीन हिंदु समाज सध्या नतद्रष्ट जीवन जगत आहे. भारतमाता, गोमाता, गंगामाता, वेदमाता, भवानीमाता, जिजामाता आणि जन्मदाती माता या ७ मातांच्या रक्षणासाठी हिंदूंचा जन्म झाला आहे, याची जाणीव हिंदूंच्या मनामनात निर्माण व्हावी. प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप असून या सर्वांच्या रक्षणासाठी हिंदूंना बळ मिळो, हे मागणे मागण्यासाठी श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन केले जाते. भारतमाता हीच आपली खरी आई आहे, ही श्रद्धाच नसल्याने आपल्यावरील प्रत्येक आक्रमण परतवून लावण्यास आपण अपुरे पडत आहोत. हीच श्रद्धा आणि भक्ती आपण आई भगवती दुर्गामातेकडे मागूया, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे धारकर्यांना केले. ४ ऑक्टोबर या दिवशी शहरातील नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध मार्गांवरून श्री दुर्गादौड निघाली. त्या वेळी ते धारकर्यांना मार्गदर्शन करत होते