हरिद्वार, १४ एप्रिल (वार्ता.) – अहिंदूंकडून हिंदूंना षड्यंत्र रचून फसवण्यात येत असल्याने त्यांनी त्याविषयी सतर्क रहाणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीवर जे आघात होत आहेत, त्याविषयी आसपासच्या परिसरातील सर्वांना संघटित करणे आवश्यक आहे, तसेच महिलांमध्येही या आघातांविषयी जागृत करायला हवे, असे मागदर्शन येथील भूपतवाला ऋषिकेश रस्त्यावरील ‘शिवसदन आश्रमा’चे स्वामी तत्त्वचैतन्य पुरीजी महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी स्वामी तत्त्वचैतन्य पुरीजी महाराज यांची भेट घेतली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी त्यांना ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले. या प्रसंगी महाराजांनी समितीचे राष्ट्र-धर्मविषयक कार्य ऐकून ‘केंद्राला अवश्य भेट देईन’, असे सांगितले. या वेळी धर्मप्रेमी श्री. संजीव पुंडिर आणि समितीचे श्री. हरिकृष्ण शर्मा उपस्थित होते.
स्वामी तत्त्वचैतन्य पुरीजी महाराज मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘गल्लीगल्लीत धर्मांध वेश पालटून फिरत आहेत. त्यांच्याविषयी जागरूक रहाणे आवश्यक आहे. सध्या अनेक चित्रपटांतून हिंदूंना भ्रमित केले जात आहे. साधूंना चुकीच्या पद्धतीने दाखवले जाते, तसेच हिंदूंना गुंडांच्या भूमिकेत दाखवून अन्य पंथांतील लोकांना चांगल्या पद्धतीने दाखवले जाते. हे सर्व बंद झाले पाहिजे.’’ महाराजांचा गांधीनगर (गुजरात) येथेही आश्रम आहे.