हिंदूंवरील अन्यायाच्या विरुद्ध जागृती करून संघटन निर्माण करण्याची आवश्यकता ! – स्वामी योगेंद्रानंद शास्त्री

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

स्वामी योगेंद्रानंद शास्त्री (मध्यभागी) यांना समितीच्या कार्याची माहिती पुस्तिका देतांना श्री. सुनील घनवट आणि श्री. संजय पुंडिर

हरिद्वार, १४ एप्रिल (वार्ता.) – सध्याच्या काळात देशात संतांवर आक्रमणे होत आहेत. संतांना फसवण्याचेही षड्यंत्र चालू आहे. साधूसंतांवर अन्याय होत आहे. देशात ठिकठिकाणी हिंदूंची पिळवणूक होत आहे. हिंदूंना जागृत करण्यासाठी प्रथम आपल्या शिक्षणव्यवस्थेत पालट केला पाहिजे. सध्याच्या शिक्षणात धर्माचे शिक्षण दिले जात नाही. हिंदूंना आपले धर्मशास्त्र आणि संस्कृती यांचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. संस्कृत भाषेविषयी कोणतेही सरकार सध्या प्रयत्न करत नाही. हे सर्व पाहून मन व्यथित होत आहे. हे सर्व रोखण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करून संघटितपणा वाढवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन खडखडी (हरिद्वार) येथील श्री जगदीश आश्रमाचे स्वामी योगेंद्रानंद शास्त्री यांनी येथे केले. येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाच्या अंतर्गत समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, मध्यप्रदेश अन् राजस्थानचे राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, तसेच धर्मप्रेमी श्री. संजय पुंडिर यांनी स्वामी योगेंद्रानंद शास्त्री यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी वरील मार्गदर्शन केले.

या वेळी श्री. घनवट यांनी स्वामी योगेंद्रानंद शास्त्री यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली, तसेच कुंभमेळ्यामध्ये लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही त्यांना दिले.