संरक्षणदलप्रमुख बिपीन रावत आणि अधिकारी यांना सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात विविध मान्यवरांच्या हस्ते श्रद्धांजली !

तमिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन पावलेले जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि अन्य अधिकारी यांना विलिंग्डन महाविद्यालय आणि भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सांगलीच्या सुप्रसिद्ध श्री गणेश दुर्गाच्या महाद्वाराची दुरवस्था !

‘‘या परिसरात खोक्यांना तेथून हटवणे आवश्यक आहे. महाद्वार हा सांगलीचा ऐतिहासिक ठेवा असून या परिसराची स्वच्छता आणि डागडुजी करण्यासाठी महापालिका प्रशासन अन् श्री गणपति संस्थानने लक्ष देण्याची नितांत आवश्यक आहे.’’

सातारा ‘जिल्हाबंदी’ करून प्रशासन शिवभक्तांचा गळा घोटत आहे ! – नितीन शिंदे, निमंत्रक, ‘श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन समिती’

प्रत्येक वर्षी प्रशासन आम्हाला जिल्हाबंदी घोषित करते. वास्तविक शिवभक्तांनी प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा केला, तर प्रशासनाला अडचण होण्याचे कारण काय ?

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्त अभिप्राय

इतकी वर्षे सातत्याते ‘हिंदु धर्म’ हाच कशाप्रकारे राष्ट्राचा धर्म आहे ? हे समाज मनावर बिंबवण्याचे कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून चालू आहे. यासाठी परात्पर गुरूंचे ऋण व्यक्त करावे तेवढे थोडेच आहे.

वादळी वारा आणि प्रचंड पावसातही श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या सांगली येथील धारकर्‍यांकडून श्रीरायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या मूर्तीची पूजा !

१४ जानेवारी १९९१ पासून ही पूजा सांगलीतील धारकर्‍यांकडून अखंडितपणे चालू आहे. त्‍यामुळेच ही पूजा आता ‘श्रीरायगड व्रत’ बनली आहे !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नागरिकांना खुले करा; अन्यथा नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून खुले करू !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नागरिकांना खुले करा अन्यथा नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून खुले करू, या मागणीचे निवेदन भाजप संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी महापालिका आयुक्त यांना दिले.

पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ३ पशूवधगृहांवर कारवाई : १३१ वासरांची सुटका !

जी माहिती मुंबईतील गोप्रेमींना मिळते, ती स्थानिक पोलिसांना कशी मिळत नाही ? कि मिळूनही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात ? अशा धर्मांधांवर गुन्हा नोंद करून न थांबता त्यांच्यावर कठोर कारवाई होणेच आवश्यक आहे !

सांगली जिल्ह्यातील बहुतांश बससेवा पूर्ववत् : कोल्हापूर जिल्ह्यातही आंदोलन स्थगित

जिल्ह्यातील ४ सहस्र कर्मचार्‍यांपैकी २ सहस्र कर्मचारी सेवेत परत आल्याने २३८ बसगाड्या चालू करण्यात आल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट आणि नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त ! – वासुदेव काळे, प्रदेशाध्यक्ष, किसान मोर्चा

‘‘सरकारने गेल्या २ वर्षांत राज्यातील अतीवृष्टी, महापूर, चक्रीवादळ यांचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना किरकोळ साहाय्य करत शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा केली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता !

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपद निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ता मिळवली असून राष्ट्रवादी काँग्रेस ९, काँग्रेस ५, तर शिवसेना ३ जागी विजयी झाली आहे. महाविकास आघाडीला एकूण १७ जागा मिळाल्या आहेत