सांगली, ११ डिसेंबर (वार्ता.) – तमिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन पावलेले देशाचे पहिले संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य अधिकारी, सैनिक यांना विलिंग्डन महाविद्यालयात ११ डिसेंबर या दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ पर्यंत विविध मान्यवर, सैनिक, माजी सैनिक, नागरिक यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विलिंग्डन महाविद्यालय आणि भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य ताम्हणकर, सेवानिवृत्त अधिकारी विंग कमांडर प्रकाश नवले आणि त्यांच्या पत्नी सौ. अरुणा नवले, ‘ग्रुप कॅप्टन’ श्रीकांत वालवाडकर, कर्नल व्ही.व्ही. हरुगडे, लेफ्टनंट कर्नल एम्.डी. कुलकर्णी, संस्कार भारती सांगली महानगरचे जिल्हा कार्यवाह श्री. विसुभाऊ कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष श्री. माधव वैशंपायन, सौ. स्मिता पंडित, डॉ. व्यंकटेश जंबगी, श्री. अमित मराठे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गिरीष पुजारी यांसह अन्यांचा समावेश होता.