दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्त अभिप्राय

‘हिंदु धर्म’ हाच राष्ट्राचा धर्म आहे, हे समाजमनावर बिंबवणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ ! – रा.वि. वेलणकर (वय ९५ वर्षे), श्री गजानन वीव्हिंग मिल्स कंपाउंड, सांगली.

परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्याकडून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून मोठे राष्ट्रकार्य चालू  आहे. सात्त्विक विचार माणसाला आकृष्ट करणे कठीण असतात, त्याऐवजी तामसिक विचारांकडे माणसे पटकन् आकृष्ट होतात. अशा स्थितीत आमच्या जन्माचे सार्थक करावे, ज्या भूमीवर आम्ही जन्माला आलो, त्या भूमीचे कल्याण व्हावे, आम्ही ज्या समाजात मोठे झालो, तो वैभवसंपन्न व्हावा, अशा प्रकारचे विचार अत्यंत थोडे लोक करतात आणि त्यांपैकी परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले हे आहेत. इतकी वर्षे सातत्याते ‘हिंदु धर्म’ हाच कशाप्रकारे राष्ट्राचा धर्म आहे ? हे समाज मनावर बिंबवण्याचे कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून चालू आहे. यासाठी परात्पर गुरूंचे ऋण व्यक्त करावे तेवढे थोडेच आहे.


‘सनातन प्रभात’ हे सर्व हिंदु बांधवांसाठी प्रेरणास्थान ! – सौ. स्वाती कुलकर्णी, पणजी (गोवा)

‘सनातन प्रभात’ हे सर्व हिंदु बांधवांसाठी प्रेरणास्थान आहे. देशात हिंदु धर्माच्या विरोधात ज्या ज्या कृती होत आहेत, त्या अन्य कोणतीही प्रसारमाध्यमे दाखवत नाहीत. केवळ ‘सनातन प्रभात’मध्येच माहिती मिळते. सणांविषयी माहिती मिळाल्याने पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळणे शक्य होईल. साधनेविषयी इतरांचे अनुभव हे प्रेरणादायी असतात. ते वाचून आपणही ‘खारीचा वाटा उचलावा’, अशी भावना निर्माण होते.


दैनिक ‘सनातन प्रभात’वरील वाचकांचा विश्वास दर्शवणारा पलूस (जिल्हा सांगली) येथील एका वाचकाचा प्रसंग !

पलूस येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. संग्राम दिलीप कुलकर्णी यांच्याकडे रविवारचे दैनिक चालू आहे. एकदा त्यांच्या कुटुंबियांकडून ‘सनातन प्रभात’ बंद करण्याचा निरोप आला. यानंतर पलूस येथील सनातनचे साधक श्री. शिवाजीराव बर्गे हे श्री. संग्राम कुलकर्णी यांना भेटण्यासाठी गेले. श्री. संग्राम यांना घरातील नातेवाइकांनी ‘दैनिक प्रत्येक वेळी वाचणे शक्य होत नाही. त्यामुळे सनातन प्रभात नको’, असे सांगितल्याचे समजल्यावर त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून राष्ट्र-धर्म रक्षणाचे मोठे कार्य चालू आहे. त्यामुळे काही कारणांमुळे जरी ‘सनातन प्रभात’ वाचणे शक्य झाले नाही, तरी हे दैनिक आपल्या घरात येणे आवश्यक आहे’, असे सांगितले. साधक श्री. शिवाजीराव बर्गे हे वयोवृद्ध असूनही आपल्याला भेटण्यासाठी आल्याचे समजल्यावर वाचक श्री. कुलकर्णी यांनी त्यांना ‘‘बर्गेकाका यापुढे काहीही अडचण असल्यास तुम्ही मला दूरभाष करा’’, असेही आपुलकीने सांगितले. यावरून ‘सनातन प्रभात’प्रती लोकांचा असलेला विश्वास आणि सनातनवरील प्रेमही व्यक्त होते.


‘सनातन प्रभात’मधील साधनेविषयीच्या मार्गदर्शनामुळे माझ्यात आंतरिक पालट झाला ! – अर्जुन तांबे, उद्योजक, पुणे

पूर्वी माझ्याकडून दैनिक सनातन प्रभातचे वाचन वरवर केले जायचे; परंतु आता मी प्रतिदिन दैनिक वाचतो. दैनिकांमध्ये बातम्यांमध्ये असलेले संपादकीय दृष्टीकोन अतिशय मार्मिक असल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांवर योग्य दिशा मिळते. दैनिकामध्ये सर्व स्तरांवरील बातम्या छापल्या जातात. त्यामुळे सर्व प्रकारचे मार्गदर्शन मिळते. लव्ह जिहाद, हलाल प्रमाणपत्र जिहाद, धर्मांतर यांविषयीच्या बातम्या वाचून हिंदु राष्ट्राची स्थापना का आवश्यक आहे ? याविषयीही आम्हा हिंदूंमध्ये जागृती होते. एवढेच नव्हे, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयीचे अमूल्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे मला स्वतःमध्ये पुष्कळ पालट जाणवत आहे. माझ्या इतरांकडून होणार्‍या अपेक्षा अल्प झाल्या असून नामजप चांगला होत आहे.


‘सनातन प्रभात’ म्हणजे धर्मराज्याकडे घेऊन जाणारा वाटाड्या ! – गिरीष पुजारी, मिरज

दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे वैविध्यपूर्ण आणि प्रतिभाशाली मार्गदर्शन, तसेच विविध सांस्कृतिक, राष्ट्रीय, सामाजिक, तसेच राजकीय समस्या यांवरील उहापोह करून दिशादर्शन करणारा मार्गदर्शकच होय. गेली अनेक वर्षे ‘सनातन प्रभात’ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे देव, देश, धर्म, अध्यात्म आणि साधना या संदर्भात काय आणि कसे करावे ? कृतीशील कसे व्हावे ? मर्यादा कुठे आहेत ?, हे लक्षात आणून देऊन वाचक, पत्रकार, धर्माभिमान, तसेच संपूर्ण समाजाला लोकशाहीतून धर्मराज्याकडे घेऊन जाणारा वाटाड्या म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’ आहे.


दैनिकातून धर्मशिक्षण मिळते ! – भगवान कुलकर्णी, गोडोली, सातारा

प्रथम तीन वर्षे साप्ताहिक चालू होते. आता रविवारचे दैनिक चालू आहे; सध्याच्या परिस्थितीत धर्मशिक्षण कुठेही मिळत नाही. दैनिकातील विषय पुष्कळ महत्त्वाचे आहेत आणि शिकण्यासारखे आहेत. आपली वागणूक कशी असावी ? हे शिकायला मिळाले आणि प्रेरणा मिळाली.


वाचकांना सनातन परिवाराविषयी वाटणारा आपलेपणा

‘संभाजीनगर येथील एक वाचक श्री. अनिल नलावडे यांची मध्यंतरी आमच्याशी भेट झाली. माझ्या मुलाचे नुकतेच लग्न झाले होते. त्यामुळे माझ्या नवविवाहित सुनेला ते म्हणाले, ‘‘तुझे या (सनातनच्या) सुंदर परिवारात स्वागत आहे. तू भाग्यवान आहेस की, तुला देवाने या परिवाराशी जोडले.’’ सनातन परिवाराविषयी समाजातील वाचकांना काय वाटते, ते अनुभवता आले. साधकांना हा सन्मान केवळ आणि केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मिळत आहे. त्याविषयी. परात्पर गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी ती अल्पच आहे.’

–  सौ. रिचा वर्मा, संभाजीनगर