सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता !

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपद निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ता मिळवली असून राष्ट्रवादी काँग्रेस ९, काँग्रेस ५, तर शिवसेना ३ जागी विजयी झाली आहे. महाविकास आघाडीला एकूण १७ जागा मिळाल्या आहेत

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने अन्नदान !

कोरोना संसर्गाच्या काळापासून कोल्हापुरात येणारा कोणताही गरीब आणि गरजू उपाशी राहू नये, या हेतूने चालू असलेली उत्तरेश्वर थाळी हा कौतुकास्पद उपक्रम असून शिवसेनाप्रमुखांना हीच खरी आदरांजली आहे.

सांगली जिल्ह्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कोविड योद्ध्यांचा ठाणे येथे सत्कार !

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात काम केलेल्या व्यक्ती, संस्था आणि रुग्णालये यांना सन्मानित करण्यात आले.

सांगलीच्या आयर्विन पुलास ९२ वर्षे पूर्ण ! – शरद फडके

या पुलाचे काम वर्ष १९२७ ते १९२९ पर्यंत चालू होते. या पुलास एकूण १३ कमानी असून त्याच्या बांधकामासाठी ६ लाख ५० सहस्र रुपये व्यय आला आहे.

सांगली जिल्ह्यात ५ दिवस जमावबंदीचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश !

आता ५ किंवा ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे, तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

महापालिका क्षेत्रात २० प्रभागांत ‘हेरिटेज’ वृक्षांची गणना चालू !

‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या अंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ‘हेरिटेज’ (जुन्या) वृक्षांची गणना चालू करण्यात आली आहे.

‘रझा अकादमी’ची पाळेमुळे सांगली जिल्ह्यात आहेत का ? याचे अन्वेषण करा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

रझा अकादमी – २ दिवसांपूर्वी अमरावती येथे झालेल्या दंगलीत ‘रझा अकादमतीचा पुढाकार होता, असे वृत्त समोर येत आहेत. त्यामुळे ‘रझा अकादमी’वर सरकारने बंदी घालण्याचे धाडस दाखवावे.

वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या विरोधात ईश्वरपूर येथे मूक मोर्चा

मुसलमान समाजाच्या वतीने १२ नोव्हेंबर रोजी दुपारी नमाज पठणानंतर मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वसीम रिजवी यांच्या चित्राला फुली मारलेली होती आणि ‘रिझवी यांच्यावर गुन्हा नोंद करा’, असे फलक मुसलमानांनी हातात धरले होते.

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचे तात्काळ त्यागपत्र घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांना अटक करावी ! – भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन

मुंबई येथील बाँबस्फोटातील आरोपींच्या भूमी कवडीमोल भावाने विकत घेणार्‍या अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.

सांगली एस्.टी. आगारात खासगी गाड्या लावून पोलीस बंदोबस्तात प्रवासी वाहतूक चालू !

ऐन दीपावलीच्या काळात संप पुकारण्यात आल्याने गावाकडे परतणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.