सांगलीच्या सुप्रसिद्ध श्री गणेश दुर्गाच्या महाद्वाराची दुरवस्था !

सांगलीच्या सुप्रसिद्ध गणेश दुर्गाच्या महाद्वाराची झालेली दुरवस्था

सांगली, १० डिसेंबर (वार्ता.) – सांगलीच्या श्री गणेश दुर्ग येथील महाद्वार जुन्या बांधकामाचा उत्कृष्ट नमूना आहे. सध्या या महाद्वाराची दुरवस्था झाली असून त्याची पडझडही होत आहे. या पडझडीमुळे येणार्‍या-जाणार्‍या लोकांच्या अंगावर ते बांधकाम पडून त्यांना इजा होण्याची दाट शक्यता आहे.

गणेश दुर्गाच्या भिंतीची झालेली पडझड

या संदर्भात भाजपचे सरचिटणीस श्री. केदार खाडिलकर म्हणाले, ‘‘या परिसरात खोक्यांचे अतिक्रमणही झाले असून त्या खोकी धारकांना तेथून हटवणे आवश्यक आहे. त्यांना कुठेतरी चांगली जागा देणेही आवश्यक आहे. महाद्वार हा सांगलीचा ऐतिहासिक ठेवा असून या परिसराची स्वच्छता आणि डागडुजी करण्यासाठी महापालिका प्रशासन अन् श्री गणपति संस्थानने लक्ष देण्याची नितांत आवश्यक आहे.’’