‘अनाम प्रेम’ संस्थेच्या तीन साधकांनी रुद्रवीणा वाजवल्यावर गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संत आणि साधक यांंना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
रुद्रवीणा हे एक प्राचीन भारतीय वाद्य आहे. सद्यःस्थितीमध्ये हे वाद्य लोप पावत चालले आहे. हे वाद्य वाजवणारे कलाकारही अल्प झाले आहेत. मुंबई येथील ‘अनाम प्रेम’ संस्थेचे संस्थापक प.पू. दादाजी (श्री. सुभाष देसाई), मुंबई हे या वाद्याच्या उत्थानासाठी कार्य करत आहेत.