‘तबलावादक श्री. योगेश सोवनी (‘अलंकार’) यांच्या तबलावादनाचा संशोधनात्मक प्रयोगाच्या वेळी संगीत अन् नृत्य यांचा अभ्यास करणार्या साधकांना आलेल्या अनुभूती
तबलावादक श्री. योगेश सोवनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होते. त्या वेळी ‘त्यांच्या तबलावादनाचा आध्यात्मिक त्रास असणार्या आणि नसणार्या काही साधकांवर सूक्ष्म स्तरावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी त्यांच्या तबलावादनाचे संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांच्या वेळी त्यांनी विविध पेशकार, कायदे, रेले, बंदिशी (टीप) तबल्यावर वाजवल्या.