१. संगीत साधना
अ. गुरूंच्या कृपेनेच संगीतातील स्वर सिद्ध होतात आणि असे सिद्ध स्वरच साधकाला ईश्वरप्राप्ती करून देऊ शकतात.
आ. स्वरांच्या माध्यमातून ईश्वरी अनुसंधानात रहाता येणे, म्हणजे संगीत साधना करणे होय.
२. अनुभव मनुष्याला जीवन जगायला शिकवतो, तर अनुभूती मनुष्याला जीवनातून मुक्त करतात.
३. गुरु जे सांगतात ते अर्थपूर्ण असते. त्या सांगण्यातील तत्त्वाशी एकरूप होणे, म्हणजेच ‘अर्थमय’ होऊन जाणे होय.’
४. ‘प्रत्येक गोष्टीतून ज्ञानार्जन करणे, म्हणजे त्यातून शिकणे होय. ज्ञानाविना कर्म व्यर्थ आहे. ‘जेथे ज्ञान तेथे आनंद आणि जेथे आनंद तेथे ईश्वर’, असे समीकरणच आहे.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ