रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation) (टीप) पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

टीप – हे एक सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवण्यात येतात.

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. रवि निर्मल ग्यानचंदानी (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप), यवतमाळ, महाराष्ट्र.

अ. ‘चित्त प्रसन्न असेल, तर अनंत प्रकारे ऊर्जा मिळते.

आ. ‘कलेशी जोडलेल्या साधकांना ऊर्जा कशी मिळते ?’, याविषयी कळले.’

२. श्री. आकाश फडे (विभागप्रमुख, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), जळगाव, महाराष्ट्र.

अ. ‘संगीताच्या माध्यमातून मनाला शांतता मिळते आणि ‘संगीताच्या माध्यमातूनही साधना होऊ शकते’, हे पाहून चांगले वाटले.’

३. अधिवक्ता नामदेव गरड (शहरमंत्री, रा.स्व.संघ), शेवगाव, महाराष्ट्र.

अ. ‘भारतीय संस्कृती प्राचीन असून ‘प्राचीनकालीन संगीत आणि आधुनिक संगीत’ यांमधील भेद माझ्या लक्षात आला.

आ. ‘जुने ते सोने’ याप्रमाणे प्राचीन शास्त्रशुद्ध संगीतातून भाव आणि लय कसे उमटतात ?’, हे सत्य अप्रतिमरित्या पहायला मिळाले.’

४. अधिवक्ता गणेश नागरगोजे, चेंबूर, मुंबई.

अ. ‘पुष्कळ चांगला विषय असून त्यातील बारकावे सूक्ष्म पद्धतीने सांगितले.’

५. अधिवक्ता महेश धांडे, बीड, महाराष्ट्र.

अ. ‘आम्हाला अगदी अल्प वेळेत सर्वकाही ‘पीपीटी’द्वारे  समजावून सांगणे’, हे पुष्कळ चांगले काम आहे.’

६. अधिवक्ता ओंकार पाटील, ठाणे, महाराष्ट्र.

अ. ‘प्रदर्शन उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहे.’

७. अधिवक्ता नामदेव जायभाय, अहिल्यानगर, महाराष्ट्र.

अ. ‘अध्यात्म-विज्ञान आणि ज्ञान-विज्ञान यांचा कसा समन्वय आहे’, हे चांगले समजले.

आ. ‘ईश्वरीय भावाने संगीतातील कृती केल्यास ईश्वरी अनुभूती येते’, हे माझ्या लक्षात आले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २८.६.२०२४)