वर्धापनदिनानिमित्त आलेल्या मान्यवरांनी ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन आश्रम’ यांच्याविषयी व्यक्त केलेले भावस्पर्शी विचार !

‘सनातन प्रभात’ हिंदूंमधील अज्ञान दूर करण्याचे महान कार्य करत आहे !

ह.भ.प. सुहासबुवा वझे

‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन संस्था’ संपूर्ण हिंदुस्थानात हिंदु संस्कृती आणि धर्मसंस्कार देण्याचे कार्य करत आहेत. हिंदु समाजाला आवश्यक असे शुद्ध, सात्त्विक, योग्य आणि सत्य ज्ञान देण्याचे महान कार्य करत आहेत. आज हिंदूंमधील अज्ञान दूर करण्यासाठी शुद्ध ज्ञान देण्याचे महान कार्य हे नियतकालिक करत आहे !’

– ह.भ.प. सुहासबुवा वझे, प्रसिद्ध कीर्तनकार, बोरी, गोवा.

‘सनातन प्रभात’ प्रत्येकाच्या घरी असले पाहिजे !

डॉ. सूरज काणेकर

‘सनातन प्रभात’ मी प्रतिदिन वाचतो. माझे वय ६२ वर्षे आहे. आजपर्यंत मी अनेक दैनिके वाचली आहेत; पण ‘सनातन प्रभात’सारखे कोणतेही दैनिक वाचले नव्हते. ‘सनातन प्रभात’ची पहिली २ पाने वाचून ‘देशभरात काय चालू आहे ?’, ‘राजकीय स्थिती काय आहे ?’, ते कळते. मानसिक आणि अध्यात्मिक उन्नती होण्यासाठी साधकांचे साधनेविषयीचे अनुभव लाभदायक आहेत. प्रत्येकाच्या घरात हे दैनिक असले पाहिजे. या दैनिकाच्या माध्यमातून ‘दैनंदिनी कृती आचारधर्मानुसार योग्य प्रकारे कशा करायच्या, हे शिकवले जाते. त्याचे प्रत्येकाने अवलंबन केले पाहिजे’, असे मला वाटते.’

– डॉ. सूरज काणेकर, सुराज्य संग्राम संघटना, फोंडा, गोवा.

‘सनातन प्रभात’ने राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम शिकवले !

श्री. दत्तात्रय आमोणकर

‘सनातन प्रभात’मुळे देशप्रेम आणि धर्म कळला. (‘सनातन प्रभात’ने उभारलेली चळवळ) ही काळाची आवश्यकता आहे. आपण आज एक झालो नाही, तर भविष्यात कधीच संघटित होऊ शकणार नाही. ‘सनातन प्रभात’ने राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम शिकवले. हे राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम प्रत्येकात निर्माण व्हायला पाहिजे. ‘सनातन प्रभात’ वाचल्यावर त्यातील काही बातम्या मी माझ्या परिचितांना सांगतो. ‘त्यांनी ‘सनातन प्रभात’ पूर्ण वाचला नाही, तरी चालेल; पण पहिली २ पाने वाचली पाहिजेत’, अशी माझी अपेक्षा असते.’

– श्री. दत्तात्रय आमोणकर, हिंदुत्वनिष्ठ, मडगाव, गोवा

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या हिंदु धर्माविषयी जागृती करण्याच्या कार्याला समस्त हिंदूंनी सहकार्य करावे !

श्री. जयंत मिरिंगकर

‘आश्रमदर्शनाची संधी मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. दैनिक ‘सनातन प्रभात’ हिंदु धर्माविषयी जागृती निर्माण करते आणि हिंदु धर्मात नवचैतन्य निर्माण करते. हिंदूंना धर्माविषयी ज्ञात नसलेल्या गोष्टी आता दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे समजू लागल्या आहेत. या कार्याला सर्व हिंदु बांधवांनी सहकार्य केले पाहिजे. हिंदु धर्मियांमध्ये जागृती झाल्यासच हिंदु धर्माचे पुनरुत्थान होणार आहे.’

– श्री. जयंत मिरिंगकर, हिंदुत्वनिष्ठ उद्योजक, शिरोडा, फोंडा, गोवा.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील अध्यात्माविषयीची माहिती वाचून प्रभावित झालो !

अधिवक्ता प्रमोद हेदे

‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभापासूनचा वाचक आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील अध्यात्माविषयीची माहिती वाचून मी पुष्कळ प्रभावित झालो आहे. या दैनिकामुळे मला अध्यात्माविषयी पुष्कळ माहिती मिळाली. हिंदु धर्म, भारतीय संस्कृती आणि हिंदूंचे गतवैभव यांचा ‘सनातन प्रभात’ प्रसार करतो. वर्धापनदिन कार्यक्रमाला भेट देऊन मला आनंद झाला आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून ईश्‍वरी राज्यासाठी (हिंदु राष्ट्रासाठी) जो संकल्प करण्यात आला आहे, त्याला आमचाही हातभार लाभू दे.’

– अधिवक्ता प्रमोद हेदे, मडगाव, गोवा.

‘दैनिकाचे काम हिंदु धर्माच्या प्रगतीसाठी पुष्कळ चांगले आहे. ‘हे कार्य असेच चालू राहो’, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो.’

अधिवक्ता अक्षय महाडिक

– अधिवक्ता अक्षय महाडिक, कुडाळ, सिंधुदुर्ग.

सनातनची सात्त्विक उत्पादने राज्यभर पोचवण्याची इच्छा असलेले हणजूण येथील श्री गणेश मंदिराचे पदाधिकारी राजेश मांद्रेकर

हणजूण येथील श्री गणेश मंदिराचे पदाधिकारी श्री. राजेश मांद्रेकर यांना आश्रम भेटीच्या वेळी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांविषयी पुष्कळ आत्मीयता असल्याचे साधकांच्या लक्षात आले. ‘ही सात्त्विक उत्पादने गोवाभर पोचवण्यासाठी काय प्रयत्न करू ?’, अशी श्री. राजेश मांद्रेकर यांनी सनातनच्या साधकांकडे विचारणा केली.

आश्रमदर्शनाच्या वेळी झालेल्या मार्गदर्शनानुसार कृती करणार !

‘आश्रमातील साधकांकडून पुष्कळ गुण आत्मसात करता आले. आश्रमदर्शन करतांना मनात अन्य कोणताही विचार नव्हता. आश्रमदर्शनाच्या वेळी झालेल्या मार्गदर्शनानुसार कृती करायचे ठरवले आहे !’

– श्री. सूरज चव्हाण, कुडाळ, सिंधुदुर्ग.

सनातन आश्रम स्वर्गाहून श्रेष्ठ वाटला !

‘सनातन संस्थेचे संस्थापक (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले यांच्यामुळे आम्हाला हिंदु धर्माविषयी सर्व माहिती मिळाली. (परात्पर गुरु) डॉ. आठवले यांनी हिंदूंचा उद्धार केला आहे. ते (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहेत. हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे. सनातन आश्रमाला भेट दिल्यानंतर मला तो ‘स्वर्गाहून श्रेष्ठ’ वाटला. हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, अशी इच्छा आहे.’

– श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, अध्यक्ष, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ.

सनातन आश्रमात हिंदु धर्माविषयी संपूर्ण ज्ञान मिळते !

‘सनातन आश्रम हा पूर्णत: अध्यात्मावर आधारित आहे. हिंदु धर्माविषयी संपूर्ण ज्ञान आश्रमात मिळते. गोमंतकातील समस्त हिंदु समाजाने रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट देऊन त्याचा लाभ घेतला पाहिजे. असे झाल्यास हिंदूंना भेडसावणार्‍या धर्मांतर आदी समस्या सुटू शकतील आणि गोवा हा एक चांगला प्रदेश बनू शकेल.’

– श्री. उमेश प्रभु, पणजी

नागरिकांनी अपप्रचाराला बळी न पडता सनातनच्या आश्रमाला भेट देऊन आश्रमाचे कार्य जाणून घ्यावे !

‘सनातनच्या आश्रमाविषयी आम्ही पूर्वी पुष्कळ ऐकले होते आणि सनातन संस्थेवर पुष्कळ आरोपही झाले आहेत. प्रत्यक्ष आश्रमाला भेट दिल्यानंतर ‘सनातन संस्था म्हणजे काय ?’, याचा अनुभव मला आला आहे. प्रत्येकाने आश्रमाला भेट देऊन सनातनचे कार्य जाणून घेतले पाहिजे. नागरिकांनी कार्य जाणून न घेता सनातन संस्थेच्या विरोधातील अपप्रचाराला बळी पडू नये. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील बातम्या वाचनीय असतात. अनावश्यक बातम्या वाचण्याऐवजी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील बातम्या वाचल्यास चांगला अनुभव येतो. दैनिक ‘सनातन प्रभात’ पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचले पाहिजे.’

– श्री. गुरुदास प्रभु, पत्रकार, फोंडा.

हिंदु धर्मियांनी सनातन आश्रमाला भेट देऊन दैव शक्ती, हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती समजून घ्यावी !

‘आश्रमातील वातावरण मनाला पुष्कळ भावले. मी पुन्हा आश्रमाला भेट देणार आहे. हिंदु धर्मियांनी सनातन आश्रमाला भेट देऊन दैव शक्ती, हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती समजून घ्यावी. ‘जीवन कसे जगावे ?’, ‘चांगले संस्कार कसे अंगीकारावे ?’ हे या ठिकाणी समजते. आश्रमात सनातनचे साधक एक परिवाराप्रमाणे रहातात. आजच्या कलियुगात असे पहायला मिळणे कठीण आहे. सनातन संस्थेचे संस्थापक (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले यांच्या आशीर्वादामुळेच हे कार्य होऊ शकत आहे.’

– श्री. भैरानाथ चौधारी, हिंदुत्वनिष्ठ व्यापारी, फोंडा

‘आश्रमात सनातनचे साधक घेत असलेले परिश्रम, तसेच त्यांचा समर्पणभाव आणि त्याग यांची प्रचीती आली !’

– श्री. प्रवीण चंद्रा, नौसेनेचे निवृत्त अधिकारी