सेवेच्या तळमळीमुळेे अनेक वाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांंना सनातनच्या कार्याशी जोडून ठेवणारे फोंडा, गोवा येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरक श्री. नागेश बिरादर !

दैनिकाचे वितरक नव्हे, ईश्‍वराचे दूत तुम्ही ।
गुरूंचे संदेशवाहक आणि ईश्‍वराचे भक्त होऊनी ॥

श्री. नागेश बिरादर
श्री. शिवदत्त नाडकर्णी

‘श्री. नागेश बिरादर हे दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रारंभीपासूनचे वितरक आहेत. समाजात त्यांना ‘नागण्णा’ या नावाने ओळखतात. पूर्वी नागण्णा सायकलवरून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करत होते. आता ते स्कूटरवरून वितरण करतात.

श्री. नागेश बिरादर हे कन्नड भाषिक आहेत. त्यांना मराठी लिहिता-वाचता येत नाही; पण मराठी बोललेले समजते. आता त्यांना मराठी अल्प-अधिक बोलायला जमत आहे. ते एकेक इंग्रजी अक्षर वाचतात. त्यांना भाषेची अडचण असूनही केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील भाव आणि श्रद्धा यांमुळे ते ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वर्गणीदार करणे, विज्ञापने घेणे, सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, हिंदु जनजागृती समितीद्वारे घेण्यात येणार्‍या अधिवेशनासाठी वस्तू आणि अर्पण घेणे अन् पंचांग वितरण करणे’, अशा सेवा करतात. त्यांच्यातील सेवेच्या तळमळीमुळे त्यांनी अनेक वाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांंना सनातनच्या कार्याशी जोडून ठेवले आहे. ‘श्री. नागेश बिरादर यांच्यातील ‘नम्रपणा, प्रामाणिकपणा, सेवेची तळमळ आणि गुरुकार्याची चिकाटी’, हे गुण आम्हा सर्व साधकांमध्ये येऊ देत’, ही गुरुचरणी प्रार्थना !’

–  श्री. शिवदत्त नाडकर्णी, फोंडा, गोवा. (मे २०२१)