दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा परिपूर्ण, तळमळीने आणि प्रामाणिकपणे करणारे कु. विशाल (वय २० वर्षे) आणि श्री. इंद्रेश बिरादर (वय २५ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

कु. विशाल बिरादर
श्री. इंद्रेश बिरादर

‘श्री. नागेश बिरादर यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना, म्हणजे कु. विशाल (वय २० वर्षे), श्री. इंद्रेश (वय २५ वर्षे) यांना साधना सांगून गुरुसेवेसाठी सिद्ध केले आहे. आता ते दोघे पहाटे ५ वाजता उठून घरापासून ५ कि.मी. अंतरावर दैनिकाचा गठ्ठा आणायला जातात आणि तेथून ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाला प्रारंभ करतात.

दळणवळण बंदीच्या काळात दैनिकाचे वितरण करण्यास काही साधकांना अडचण येत होती, तेव्हा त्यांनी त्या साधकांना वितरण करण्यास साहाय्य केले. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने नोव्हेंबर २०२० पासून दोघेही नियमितपणे दैनिकाचे वितरण करत आहेत. ‘कोरोना महामारी’च्या काळात सर्व नियम पाळून त्यांनी दैनिक वितरण केले.

वितरणात अंक अल्प मिळणे, गठ्ठा न मिळणे इत्यादी अडचणी आल्या, तर ते पहाटेच भ्रमणभाष करून त्याविषयी मला विचारतात. एके दिवशी दैनिकाचा गठ्ठा हरवला, तेव्हा त्यांनी तो आजूबाजूला शोधला आणि गठ्ठा मिळत नसल्याचे पहाटेच भ्रमणभाष करून मला सांगितले. नंतर त्यांनी साधारण एक घंटा काळोखात दैनिकाचा गठ्ठा शोधण्याचा प्रयत्न केला.

यांतून त्यांची ‘परिपूर्ण सेवा करणे, सेवेची तळमळ, प्रामाणिकपणा’, हे गुण दिसून येतात.’

– श्री. शिवदत्त नाडकर्णी, फोंडा, गोवा. (मे २०२१)