‘देवळात देवतेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमुळे देवतातत्त्व कसे साकार होते ?’, हे कळण्यासाठी श्री भवानीदेवीच्या मूर्तीस्थापना विधीच्या कालावधीत देवळात ध्वनीमुद्रित केलेल्या नादांचा केलेला अभ्यास
श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे डोळे सूक्ष्मातून उघडण्याचा विधी झाल्यामुळे आणि देवीची मूर्ती देवळात पिंडिकेवर प्राणप्रतिष्ठा न करता नुसती ठेवूनही देवळात चैतन्य येऊ लागले, तसेच देवळात प्राणशक्तीही येत असल्याचे लक्षात आले. यावरून ‘देवीची मूर्ती जागृतावस्थेत येण्याची प्रक्रिया घडत आहे’, असे जाणवले, तसेच देवीचे सूक्ष्मातून रणदुंदुभी आणि नगारे वाजवून स्वागत होत होते.