साधकाने अनुभवलेली सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपाची परिणामकारकता !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. औषधोपचार करूनही पोटाचा त्रास न्यून न होणे 

‘मला २ वर्षांपासून पोटात ‘गॅस’ होणे, पोटात गुडगुड आवाज होणे आणि नंतर शौचास जावे लागणे’, असा त्रास होत होता. त्यासाठी मी ॲलोपॅथीची आणि आयुर्वेदिय औषधे घेतली. मी औषधे घेत असतांना माझा त्रास थोड्या प्रमाणात न्यून होत असे आणि मी औषधे घेण्याचे थांबवल्यावर मला पुन्हा त्रास चालू होत असे. मी गावठी वैद्यांकडून काढेही घेतले; पण त्यानेही माझा त्रास न्यून होत नव्हता.

श्री. सीताराम (नाना) आग्रे

२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे ४ मास नामजपादी उपाय केल्यावर पोटाचा त्रास न्यून होणे 

त्यानंतर मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना त्रासाविषयी सांगितले. त्यांनी मला ‘श्री दुर्गादेव्यै नमः । – श्री दुर्गादेव्यै  नमः । – श्री दुर्गादेव्यै नमः । – ॐ नमः शिवाय । – ॐ नमः शिवाय ।’ असा नामजप प्रतिदिन एक घंटा करायला सांगितला. त्याप्रमाणे मी नामजप करायला आरंभ केला. मी असा नामजप करायला लागल्यावर मला थोडा थोडा पालट जाणवू लागला. मी ४ मास हा नामजप केला. नंतर मला होणारा पोटाचा त्रास न्यून झाला.

३. त्याच वेळी वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांनी माझ्यावर पंचकर्म करायला आरंभ केला होता. 

४. कृतज्ञता 

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या कृपेने माझा शारीरिक त्रास न्यून झाला’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांनी माझ्याकडून वेगवेगळे उपचार करून घेतल्याबद्दल मी त्यांच्या प्रतीही कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. सीताराम (नाना) आग्रे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१०.१०.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक