‘गोव्यातील रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील परिसरात श्री भवानीदेवीसाठी नवीन देऊळ बांधण्यात आले. त्या नूतन देवळात श्री भवानीदेवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
आपल्याला ठाऊक आहे की, देवळात एखाद्या देवतेची मूर्ती प्रतिष्ठापित केल्यावर तिच्यामध्ये त्या देवतेचे तत्त्व येते. देवतेचे तत्त्व, म्हणजे त्या देवतेची सूक्ष्मातील स्पंदने ! देवळाच्या कळसामुळे ब्रह्मांडातील देवतेची सूक्ष्मातीसूक्ष्म (निर्गुण स्तरावरील) स्पंदने आकर्षित होण्यास साहाय्य होते, तसेच देवतेच्या मूर्तीतून प्रक्षेपित होणारी सगुण स्तरावरील स्पंदनेही कळसाकडून प्रक्षेपित होतात. ही सर्व सूक्ष्मातील प्रक्रिया आहे. ती लक्षात येण्यासाठी ‘देवळात देवतेची मूर्ती स्थापित करण्याअगोदर देवळातील स्पंदने कशी असतात ? देवळात देवतेची मूर्ती बसवल्यावर; पण तिच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी तेथे स्पंदने कशी असतात ? मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर, तसेच प्राणप्रतिष्ठेच्या दुसर्या दिवशी देवळात स्पंदने कशी असतात ?’ इत्यादींचा अभ्यास देवळातील नाद (कंपने) ध्वनीमुद्रित करून करण्यात आला. हा नाद १. देवळात भूमीलगत, २. भूमीपासून ३० सें.मी. अंतरावर, ३. देवळाचा घुमट (कळसाच्या खालचा अर्धगोलाकार भाग) आरंभ होतो तिथे आणि ४. देवळात घुमटामध्ये सर्वांत वरच्या ठिकाणी (कळसाला आरंभ होतो तिथे), अशा चार स्थानी ध्वनीमुद्रित करण्यात आला. प्रत्येक नाद हा एक ते दीड मिनिटांचा होता. ते सर्व नाद ऐकून मला आलेल्या अनुभूती आणि ‘त्यांवरून देवळात श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने देवीचे तत्त्व येण्याची काय प्रक्रिया घडली ?’, याची माहिती येथे दिली आहे.
या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/871732.html
१. श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा विधीच्या ३ दिवस अगोदर झालेल्या ‘संकल्पा’चा दिवस
या दिवशी सकाळी श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा विधीचा संकल्प करण्यात आला. तसेच पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध इत्यादी प्राथमिक विधी करण्यात आले. श्री भवानीदेवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यासाठी देऊळ सिद्ध (तयार) होते; पण त्याच्यामध्ये मूर्ती बसवण्यासाठी पिंडिका स्थापित केलेली नव्हती. पिंडिका म्हणजे देवतेचे आसन असते. तिला पन्हाळी असते.
या दिवसाचे विधी पूर्ण झाल्यावर देवळात नाद ध्वनीमुद्रित करण्यात आले.
वरील अनुभूतींतून लक्षात येते, ‘जरी देवळात देवतेची मूर्ती नसली, तरी मूर्तीस्थापनेचा संकल्प करण्यात आला असल्याने देवळाचे कार्य आरंभ झाले होते. देऊळ ब्रह्मांडातील देवीतत्त्वाशी जोडले गेले आणि देवळात ब्रह्मांडातील शक्तीचा प्रवाह येऊ लागला.’
२. श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा विधीच्या २ दिवस अगोदर केलेल्या विविध होमांच्या दिवशी
या दिवशी विविध होमांसाठी यज्ञकुंडामध्ये अग्नीस्थापना करण्यात आली. विविध होमांमध्ये वास्तुहोम, नवग्रह होम आणि प्रधान देवता (श्री भवानीदेवी) होम करण्यात आले, तसेच या दिवशी देवळावर कळस स्थापन करण्यात आला.
यानंतर देवळात नाद ध्वनीमुद्रित करण्यात आले.
वरील अनुभूतींतून लक्षात येते, ‘या दिवशी वास्तुहोम, नवग्रह होम आणि प्रधान देवता (श्री भवानीदेवी) होम करण्यात आले. या यज्ञांमुळे संकल्पित देवतेचे तत्त्व येणे सुकर झाले. यानुसार देवीचे मारक तत्त्व आणि तारक तत्त्व देवळात यायला आरंभ झाला होता. या दोन्ही तत्त्वांमुळे ‘देवळातील नाद सगुण आणि निर्गुण यांना जोडणारा आहे’, असे जाणवले. तारक तत्त्वामुळे मला शांतीची अनुभूती आली, तसेच आध्यात्मिक भावाची स्पंदनेही जाणवली. तसेच देवळावर कळस स्थापन केल्यामुळे स्पंदने प्रक्षेपित होण्यासही आरंभ झाला. त्यामुळे घुमटामध्ये सर्वांत वरच्या ठिकाणी (कळसाला आरंभ होतो तिथे) ध्वनीमुद्रित केलेला नाद ऐकून मला एखाद्या ‘रॉकेट’प्रमाणे अवकाशात झेपावल्यासारखे जाणवले.’
३. श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा विधीच्या १ दिवस अगोदर केलेल्या देवतेच्या ‘नेत्रोन्मीलन’ विधीच्या आणि देवळात पिंडिका स्थापनेच्या दिवशी
या दिवशी देवळात मूर्ती बसवण्यासाठी पिंडिका स्थापना करण्यात आली. तसेच श्री भवानीदेवीच्या मूर्तीचा ‘नेत्रोन्मीलन’ विधी करण्यात आला. ‘नेत्रोन्मीलन’ विधी म्हणजे देवीच्या मूर्तीचे डोळे सूक्ष्मातून उघडण्यासाठी मंत्रोच्चारांसहित मूर्तीच्या डोळ्यांवर संस्कार करणे. त्यानंतर मूर्ती देवळात पिंडिकेवर नुसती ठेवण्यात आली.
यानंतर देवळात नाद ध्वनीमुद्रित करण्यात आले.
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.१०.२०२४)
(क्रमश:)
|