रशियासमर्थक फुटीरतावाद्यांच्या आक्रमणात युक्रेनचे २ सैनिक ठार ! – युक्रेनचा दावा
रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या सीमासंघर्षाने आता जणू युद्धाचे स्वरूप घेतले आहे. पूर्व युक्रेनमध्ये रशिया समर्थक फुटीरतावाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये युक्रेनचे २ सैनिक ठार, तर ४ जण घायाळ झाले, असा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे.