रशियाच्या कारवाया वैश्विक सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था यांच्यासाठी आव्हान ! – जी-७
(‘जी-७’ हा कॅनडा, अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जापान या ७ देशांचा समूह आहे.)
कीव (युक्रेन) – रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या सीमासंघर्षाने आता जणू युद्धाचे स्वरूप घेतले आहे. पूर्व युक्रेनमध्ये रशिया समर्थक फुटीरतावाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये युक्रेनचे २ सैनिक ठार, तर ४ जण घायाळ झाले, असा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे.

रशियाच्या या कारवाईनंतर उभय देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडली आहे, असे म्हणायला वाव आहे. युक्रेनच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या फुटीरतावाद्यांनी गेल्या काही दिवसांत ७० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. दुसरीकडे ‘युक्रेनच्या सैन्यानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने फुटीरतावादी गटांकडून प्रतिआक्रमण करण्यात आले’, असा प्रत्यारोप त्यांच्या अधिकार्यांनी केला आहे.
रशिया-युक्रेन सीमासंघर्षावरून ‘जी-७’ देशांच्या समुहाने संयुक्त वक्तव्य जारी केले आहे. सदस्य देशांच्या विदेशमंत्र्यांनी म्हटले आहे, ‘रशियाच्या सैन्याने क्रीमियावर अवैधरित्या मिळवलेला ताबा, तसेच बेलारूसमध्ये रशियाच्या सैन्याचे एकत्रीकरण या घटनांमुळे आम्ही चिंतित आहोत. रशियाच्या सैनिकांची होत असलेली जमवाजमव आणि अयोग्य रूपाने करण्यात येत असलेल्या कारवाया या वैश्विक सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था यांच्यासाठी आव्हान आहे.’
ढाका (बांगलादेश) येथे अज्ञातांनी हिंदु पुजार्याला पैशांसाठी अमानुष मारहाण करून रस्त्यावर फेकले
व्हेनेझुएलातून शवविच्छेदन अहवालाविना भारतात पाठवला भारतीय नाविकाचा मृतदेह !
तालिबानकडून पाकमधील इस्लामिक स्टेटच्या तळांवर ड्रोनद्वारे आक्रमण
Ford Rehired Engineer : ‘एआय’च्या मर्यादा लक्षात येताच ‘फोर्ड’ आस्थापनाने शेकडो अभियंत्यांना पुन्हा कामावर घेतले !
बांगलादेश : इस्कॉनचे कारागृहात असलेले चिन्मय प्रभु यांच्या जिवाला गंभीर धोका !
POK Protests : पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग नसून जर दडपशाही थांबली नाही, तर भारतासमवेत जाऊ !