मेवात (हरियाणा), देहली आणि मणीपूर येथील हिंसाचारातील हिंदूंच्‍या हत्‍या करणार्‍या दंगलखोरांवर कठोर कारवाई करा !

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

धर्मादाय विभागाकडून मंदिराला नोटीस बजावून मंदिर नियंत्रणात घेण्याची चेतावणी !

सूर्यपेट (तेलंगाणा) येथील बाल उग्र नरसिंह स्वामी मंदिरात अनागोंदी असल्याची मुसलमानाची तक्रार !

निवेदन न स्वीकारण्यास शाळा सुधारणा समितीच्या धर्मांध सदस्याकडून मुख्याध्यापकांवर दबाव !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अशा २ घटना आतापर्यंत घडल्या आहेत. यातून भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना काँग्रेसच्या राज्यात कर्नाटकमध्ये इस्लामी राजवट आली आहे, असेच निदर्शनास येत आहे. काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

हिंदु जनजागृती समितीची स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’ !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालय आणि प्रशासन यांनी आवश्यक ती कारवाई करावी, या मागणीसाठी निवेदने देण्यात आली.

रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह ९५ ठिकाणी निवेदने !

स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकचे ध्वज वापरल्याने ध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन, पोलीस यांना निवेदने !

स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने राष्‍ट्रध्‍वजाची होणारी विटंबना रोखण्‍यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्‍हापूर जिल्‍ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन आणि पोलीस यांना ठिकठिकाणी निवेदन देण्‍यात आले.

सांगली जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन, पोलीस यांना निवेदने !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी सांगली जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन आणि पोलीस यांना ठिकठिकाणी निवेदन देण्यात आले.

 राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नका ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह  

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी’ निवेदन देण्यात आले होते. जिल्हाधिकार्‍यांकडून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयीचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये निवेदने

श्री. प्रमोद शेखर म्हणाले की, १५ ऑगस्टच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेऊ, तसेच समितीच्या वतीने लावण्यात येणार्‍या ‘क्रांतीगाथा प्रदर्शना’साठीही सहकार्य करू.

राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान रोखण्यासाठी मुलुंड येथील नायब तहसीलदारांना निवेदन !

मुंबईत आतापर्यंत ५ पोलीस ठाणी, ३ महाविद्यालये, ४ शाळा आणि २ शिकवणीवर्ग येथे समितीच्‍या वतीने वरील विषयांची निवेदने देण्‍यात आली. या वेळी समितीच्‍या कार्यकर्त्‍यांसह स्‍थानिक राष्‍ट्रप्रेमीही सहभागी झाले होते.