हिंदु जनजागृती समितीची मागणी

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या हिंदु मंदिरांविषयी समाजात जातीय विद्वेष, घृणा आणि शत्रुत्वाची भावना पसरवून आतंकवादाला प्रोत्साहन देणार्या झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुपरी येथे नगर परिषदेत प्रशांत तराळ आणि पोलीस ठाण्यात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख ऋषिकेश दयानंद साळी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. महादेव आडावरकर, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री नितीन काकडे, ऋषिकेश दिवाण, गौरव नेमिष्टे, सचिन माळी, अनिकेत देशमुख, पद्मराज इंग्रोळे, संदीप निकम, श्री. सौरभ बेगडे उपस्थित होते.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !