हिंदु जनजागृती समितीची केंद्र सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी !


मुंबई – ‘हिंदु मंदिरात काम करण्यासाठी जाणे सर्वांत मोठे महापाप आहे’, तसेच ‘मंदिर वा चर्चमध्ये जाण्यापेक्षा सहस्रो लोकांना मारणार्या शस्त्र बनवणार्या कारखान्यात जाणे अधिक चांगले. मंदिर किंवा चर्च येथे ‘शिर्क’ (महापाप) केले जाते. ‘शिर्क’ हे इस्लामनुसार महापाप आहे. अल्लाने स्पष्टपणे म्हटले आहे की, मी कुणालाही क्षमा करू शकतो; पण ‘शिर्क’ केलेल्याला कधीही माफ करत नाही’, अशी आक्षेपार्ह वक्तव्ये ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’चे डॉ. झाकीर नाईक याने ‘हुडा टी.व्ही.’ नावाच्या यू-ट्यूब वाहिनीवर मुलाखत देतांना केली. यामुळे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या हिंदु मंदिरांविषयी समाजात जातीय विद्वेष, घृणा आणि शत्रुत्वाची भावना पसरवून आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचे दुष्कृत्य झाकीर नाईक याने याने केले आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या स्वाधीन देण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव आणावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. समितीच्या वतीने मुंबईच्या जिल्हाधिकार्यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांंच्या नावाने निवेदन सादर केले आहे. या वेळी समितीचे श्री. सतीश सोनार यांच्यासह हिंदु धर्मप्रेमी सर्वश्री रविंदर दासारी, संदीप तुळसकर, सुशील भुजबळ, विलास निकम आणि मनीष सैनी उपस्थित होते.
केंद्र सरकारने आतंकवादी संघटना म्हणून बंदी घातल्यानंतरही झाकीर नाईक आणि ‘इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’ यांचे फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सर्व अनेक सामाजिक माध्यमांवरील खाती चालू आहेत. ती त्वरित बंद करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
ConfirmTkt Controversy : ‘कन्फर्म तिकीट’ आस्थापनाने श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार
वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांच्यात फूट पाडणार्यांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार !
पुणे येथे ‘हलाल अर्थव्यवस्था आणि भारत’ या विषयावर श्री. रमेश शिंदे यांचे ३१ जुलैला जाहीर व्याख्यान !
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार