लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवे ध्वज काढण्याची अनाठायी कृती थांबवा !

घरावर भगवा ध्वज लावणे, हा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार समजला जाऊ शकत नाही. तसे समजून जर तो ध्वज काढण्याची कृती केली गेली, तर तो हिंदूंच्या धार्मिक आचरणावर गदा आणण्यासारखे होईल.

युद्धाचा फतवा काढणार्‍या ‘दारूल उलूम देवबंद’वर तात्काळ बंदी घाला !

‘दारूल उलूम देवबंद’ने ‘गझवा-ए-हिंद’ (भारतावर आक्रमण) असा फतवा काढून भारतीय राज्यघटना, कायदे आणि सरकार यांना थेट आव्हान देऊन युद्धाची भाषा केली आहे.

सातारा जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या घटनांचे अन्वेषण प्राधान्याने करून चोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करा !

चोरांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हे सर्व खटले द्रुतगती (फास्टट्रॅक) न्यायालयात चालवण्यात यावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

इस्लामपूरचे ‘उरुण ईश्वरपूर’ नामकरण लवकरच ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

येथे ८ मार्च या दिवशी ‘शासन आपल्या दारी’ या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ईश्वरपूर दौर्‍यावर आले होते. या वेळी त्यांनी यल्लामा चौक येथे शिवसेना सांगली जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांचा मुख्य सूत्रधार शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी !

संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांचा ‘मास्टर माईंड’ (मुख्य सूत्रधार) शोधून कारवाई करावी, या संदर्भातील निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ७ मार्च या दिवशी भोर येथील तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन देण्यात आले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर भ्याड आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी म्हणजे ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व असून त्यांनी अनेक युवकांना दिशा देऊन त्यांना देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणासाठी कृतीशील केलेले आहे.

राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करणार्‍या पोलिसांवर कारवाई करा ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करणारे राजवाडा पोलीस ठाण्यातील सर्व उत्तरदायी अधिकारी, पोलीस यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा सकल हिंदु समाज आंदोलन करेल, असे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना देण्यात आले.

जळगाव शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरावरील भगवे ध्वज काढू नयेत ! – हिंदु जनजागृती समिती

जळगाव येथील महानगरपालिका आयुक्तांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका हद्दीतील राजकीय पक्ष किंवा पदाधिकारी यांचे झेंडे, फलक, बॅनर, होर्डिंग्ज आदी हटवण्यासंदर्भातील आदेश नुकताच काढला होता.

अयोध्येतील श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा !

अयोध्येत प्रभु श्रीराममंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्यानंतर देशभरात कट्टरतावादी धर्मांधांकडून येनकेन प्रकारेण हिंदूंवर आक्रमणे करण्यात येणे, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, देशविरोधी भावना निर्माण करणे..

संत बाळूमामा देवस्थानाचे मंदिर सरकारीकरण करू नये !

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानात ज्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला, त्यांना शिक्षा करावी; मात्र या प्रकरणाचे निमित्त करून मंदिराचे सरकारीकरण करू नये