नाशिक येथे अप्पर जिल्हाधिकारी आणि कोपरगाव येथे निवासी नायब तहसीलदार यांना निवेदन
नाशिक – ‘हिंदु मंदिराच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. झाकीर नाईक याला संयुक्त राष्ट्र संघात आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या कह्यात देण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नाशिक येथे समितीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांची कार्यालयात भेट घेऊन त्यांना हे निवेदन देण्यात आले. या वेळी निवेदन देतांना समितीचे सर्वश्री संदीप वाघ, हिंदु धर्मप्रेमी सर्वश्री नंदकिशोर भावसार, चेतन सूर्यवंशी, सुमंत वैद्य, निखिल अहिरराव उपस्थित होते. कोपरगाव येथे निवासी नायब तहसीलदार श्रीमती प्रफुल्लिता सातपुते यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री सनी गायकवाड, अशोक नायगुडे, सनी काळे, राहुल चवंडके, प्रसाद निकम, ओमकार जाधव, दत्ता भागिले, विवेक गर्जे, प्रसाद सारंगधर, योगेश रुईकर, आकाश वैद्य आदी धर्माभिमानी उपस्थित होते.