बांगलादेशांतील हिंदूंच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी करावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

बांगलादेशात उफाळलेला हिंसाचार

‘बांगलादेशात हिंदूंवर होत असलेली आक्रमणे सातत्याने घडत आहेत. परिणामी अल्पसंख्यांक हिंदु समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भारत सरकारने तेथील हिंदु समाज आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने धनबाद (झारखंड) येथील आंदोलनाच्या माध्यमातून केली. या आंदोलनानंतर या मागण्यांविषयीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांकडे सोपवण्यात आले. या आंदोलनात इस्कॉन, भारत सेवाश्रम संघ, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तरुण हिंदु, आर्य समाज, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्यासह अन्य हिंदु संघटना अन् हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.’