पवित्र अयोध्येला मद्य-मांसमुक्त करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

आज देशात अनेक तीर्थस्थळांच्या ठिकाणी पर्यटन विकासाच्या नावावर मद्यालये आणि मांस यांची दुकाने उघडण्यात आली आहेत. ती बंद करणे आवश्यक आहे. याप्रमाणेच हिंदूंसाठी परमपवित्र असलेल्या अयोध्येला संपूर्ण मद्य-मांसमुक्त करण्यात यावे, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त करण्यात आली.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय यांची हिंदुत्वनिष्ठांनी घेतली भेट !

अन्न पदार्थ आणि उत्पादने यांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकार केवळ सरकारला आहे. खासगी संस्थांना नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. असे असतांना काही खासगी इस्लामी संस्था बेकायदेशीरपणे ‘हलाल प्रमाणपत्र’ देऊन व्यापार्‍यांची मोठ्या प्रमाणावर लुट करत आहेत.

‘हेट स्पीच’प्रकरणी माटुंगा आणि वरळी पोलीस ठाण्यात तक्रार !

११ डिसेंबर या दिवशी माटुंगा, तर १२ डिसेंबर या दिवशी वरळी पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार प्रविष्ट करण्यात आली.

Banish ‘Sunburn’ Festival Totally From Goa ! : ‘सनबर्न’ महोत्सवाला गोव्यातून कायमचे हद्दपार करा !

गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. गोमंतकीय संस्कृतीचे रक्षण करणे, हे आपले दायित्व आहे.

Ban Halal Products In Goa : उत्तरप्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर गोव्यात हलाल उत्पादनांच्या विक्रीवर बंदी आणा !

गोव्यातही हलालप्रमाणित खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, ‘नमकीन’पासून ते सुकामेवा, मिठाई, धान्य, तेल यांपासून ते साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, नेलपॉलिश, लिपस्टिक आदी लहान दुकानांपासून मोठ्या मॉलपर्यंत सर्वत्र विकली जात आहेत.

सनातन धर्माविषयी अवमानकारक विधाने (हेट स्पीच) करणार्‍यांच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत तक्रारी प्रविष्ट !

सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांत देण्यात आले.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘शिवराजेश्वर मंदिरा’साठीच्या वार्षिक भत्त्यात वाढ करण्याची मागणी !

मालवण येथील शिवरायांच्या मंदिराच्या ठिकाणी शिवरायांच्या कार्याची माहिती देणारे फलक, ग्रंथालय, ऐतिहासिक ठेवा, चित्राच्या स्वरूपात इतिहासाची मांडणी, अशा प्रकारे इतिहासाची माहिती देण्यात यावी.

हिंदु देवतांचे विडंबन केल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी !

धर्मरक्षणासाठी सतर्क आणि तत्पर असणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन ! संबंधितांवर कठोर कारवाई होईपर्यंत पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा घ्यावा !

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्‍यवस्‍था रहित करा ! – इचलकरंजी येथे निवेदन

‘सनातन धर्मा’ला नष्‍ट करण्‍याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारे उदयनिधी स्‍टॅलिन, ए. राजा अन् त्‍याचे समर्थन करणारे प्रियांक खर्गे यांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी, या मागण्‍यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देण्‍यात आले.

सनातन धर्माचा अवमान केल्‍याविषयी उदयनिधी स्‍टॅलीन यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करा !

सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य करून हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍याप्रकरणी तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे खासदार ए. राजा यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात यावा.