हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली आणि पुणे जिल्ह्यांत निवेदन सादर !
सांगली, ६ ऑगस्ट (वार्ता.) – उरणमधील कु. यशश्री शिंदे या हिंदु तरुणीची निर्घृण हत्या करणार्या नराधमाला भरचौकात फाशी द्यावी आणि हिंदु तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ५ ऑगस्ट या दिवशी सांगली येथील जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. दिगंबर कोरे, शिवसेना उपशहर प्रमुख श्री. विनायक एडके, उपजिल्हाप्रमुख शिवसेना श्री. उमाकांत कार्वेकर, श्री. विराज पोळ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.