आदिवासी समाजाने धर्मांतराच्या विरोधात ७ जिल्ह्यांमध्ये पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्तीसगडमध्ये ख्रिस्तीधार्जिणे काँग्रेसचे सरकार सत्तेत असल्यामुळे तेथे धर्मांतर करणार्‍यांवर कारवाई होईल, अशी अपेक्षाच नको. तेथे परिणामकारक संघटनाद्वारेच धर्मांतराचे प्रकार रोखले जाऊ शकतात !

आटपाडीतील ख्रिस्ती धर्मप्रचारक संजय गेळेच्या समर्थनार्थ निघणार्‍या मोर्चास पोलिसांनी अनुमती देऊ नये ! – सकल हिंदु समाजाची मागणी

आटपाडीतील ख्रिस्ती धर्मप्रचारक संजय गेळे यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद असून त्यांची पत्नी अद्याप पसार आहे. त्यांची संपत्ती, तसेच गेल्या १० वर्षांत केलेल्या कारभाराचे अन्वेषण करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत केली आहे.

बांगलादेशात पैगंबर यांच्या कथित अवमानावरून हिंदु संघटनेच्या नेत्याला ७ वर्षांचा कारावास !

बनावट फेसबुक खाते निर्माण करून त्याद्वारे पैगंबरांचा अवमान करणारे लिखाण प्रसारित करण्यात आल्याचा हिंदु नेत्याचा आरोप !

उत्तरप्रदेशमध्ये जलालुद्दीनकडून हिंदु कामगारांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव !

बलरामपूर जिल्ह्यात धर्मांतराशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले आहे. जलालुद्दीन याने त्याच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी रोजंदारीवर काम करणार्‍या हिंदु कामगारांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला आणि त्यांना पैशांचे आमीष दाखवले, असा आरोप या रुग्णालयाचा कंत्राटदार वसीउद्दीन याच्या पत्नीने केला आहे.

नारायणपूर (छत्तीसगड) येथे धर्मांतराच्या विरोधातील बंदच्या वेळी आदिवासींकडून चर्चची तोडफोड !

‘देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने आता जनताच धर्मांतराचा विरोध करण्यासाठी कायदा हातात घेत आहेत’, असे म्हटल्यास चूक ते काय ? याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !

पाकमध्ये हिंदु विवाहित तरुणीचे मुसलमान पोलीस कर्मचार्‍याकडून अपहरण आणि विवाह !

पाकमध्ये पोलीस कर्मचारी ओबेदुल्ला खोसो याने विवाहित हिंदु तरुणी लाली कच्छी हिला बलपूर्वक पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला.

(म्हणे) ‘धार्मिक कार्यक्रम करण्यास लादलेली बंदी हटवा, अन्यथा उपोषण करणार !’ – ‘बिलिव्हर्स’चे पास्टर डॉम्निक यांच्या समर्थकांची चेतावणी

प्रशासनाने ‘बिलिव्हर्स’च्या धमक्यांना भीक न घालता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर रहावे ! हिंदू सहिष्णू असल्याने अनेक हिंदूंचे आमिषे दाखवून आणि फसवणूक करून धर्मांतर झाले, तरी हिंदूंनी वैध मार्गाने धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवला !

कर्णावती (गुजरात) येथील ‘कार्निव्हल’मध्ये ‘सांताक्लॉज’ बनून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत धर्मांतराचा प्रयत्न

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर वाद आणि हाणामारी !

जे हिंदु संघटनांना कळते, ते पोलिसांना का कळत नाही ?

पटवई येथील सोहना गावामध्ये पाद्री पोलूम मसीह हा तंबू ठोकून १०० हून अधिक दलित हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या प्रयत्नात होता. याची माहिती हिंदु संघटनांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांना याविषयी कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाद्री पोलूम याला अटक केली.’

धर्मांतराच्या निषेधार्थ हिंदु समाजाच्या वतीने आटपाडी (सांगली) येथे मोर्चा !

आटपाडी, जिल्हा सांगली येथील वरद रुग्णालय येथे धर्मांतराचा प्रयत्न करणारे संजय गेळे आणि त्यांची पत्नी अश्विनी गेळे यांच्या कारभाराचे अन्वेषण करावे, त्यांच्या संपत्तीचे अन्वेषण व्हावे, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यांसाठी हिंदु समाजाच्या वतीने ३० डिसेंबरला येथे मोर्चा काढण्यात आला.