|
कानपूर (उत्तरप्रदेश) – कानपूरमध्ये प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या घटना समोर येत आहेत. नुकतेच कानपूरमधील हरबंश मोहल येथे शाहरुख नावाच्या एका मुसलमान तरुणाने सौरभ बनून रेणू नावाच्या हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्याने रेणूवर धर्मांतर करून विवाह करण्यासाठी दबाव आणला. तसे न केल्यास तिला अपकीर्त करण्याची धमकी दिली.
कानपुर में ‘लव जिहाद’! सौरभ बनकर मिला था शाहरुख, धर्मांतरण के दबाव पर महिला ने दी जान https://t.co/nam9Usiacu
— Headlines Today News (@HeadlinestodayN) April 15, 2023
भीतीपोटी रेणूने गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती तिचे वडील गिरधारी कश्यप यांनी दिली. हरबंश मोहल पोलीस ठाण्याचे प्रभारी विनित चौधरी यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
#FitIndiaSuperhitBulletin: कानपुर में लव जिहाद का सनसनीखेज मामला आया सामने.. छेड़खानी से तंग आकर युवती ने लगाई फांसी, पुलिस ने दर्ज किया मामला@PreetiNegi_ और @iamdeepikayadav के साथ देखिए, ‘फिट इंडिया सुपरहिट बुलेटिन’ #Kanpur #UPPolice #LoveJihad #UttarPradesh pic.twitter.com/FqrGxKRNiL
— Times Now Navbharat (@TNNavbharat) April 15, 2023
मुसलमानांच्या त्रासाला कंटाळून मुलींनी आत्महत्या केल्याची गेल्या १० दिवसांतील ही चौथी घटना आहे. ४ आणि ५ एप्रिल या दिवशी कानपूरच्या सचेंडी, साध अन् कर्नलगंज पोलीस ठाण्यांचा परिसरात मुसलमान तरुणांनी दिलेल्या धमक्यांमुळे ३ विद्यार्थिनींनी गळफास लावून आत्महत्या केली होती.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चा आणखी एक बळी ! ज्या प्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंडांच्या घरांवर बुलडोझर फिरवून त्यांना धडा शिकवला, तशीच कारवाई आता हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या लव्ह जिहाद्यांच्या विरोधातही तात्काळ केली पाहिजे ! समस्त हिंदूंनीही अशी आग्रही मागणी सरकारकडे केली पाहिजे ! |