
रत्नागिरी, १३ एप्रिल (वार्ता.) – गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतरण यांविषयीचे कायदे त्वरित व्हावेत, यासाठी येथे ‘हिंदु गर्जना मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. १५ एप्रिलला दुपारी ४ वाजता हा मोर्चा श्री शिवतीर्थ मारुति मंदिर येथून चालू होणार असून या मोर्च्याला योगिताताई साळवी, धनंजय देसाई, विनय पानवळकर मार्गदर्शन करणार आहेत. या मोर्च्याचा प्रारंभ मारुति मंदिर येथून होऊन माळनाका, जयस्तंभ, राम आळी, गोखले नाका या मार्गावरून पुढे जात स्वातंत्र्यवीर लक्ष्मी चौक, गाडीतळ येथे समारोप होणार आहे. या ‘हिंदु गर्जना मोर्चा’ला सर्व हिंदु बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
आज पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती देण्यात आली. या वेळी संतोष पावरी, राकेश नलावडे, केशव भट, संजय जोशी आणि चंद्रकांत राऊळ उपस्थित होते.

लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि अवैध प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांनी उच्छाद मांडला आहे. कोणती हिंदु मुलगी अथवा महिला लव्ह जिहादला कोणत्या क्षणी बळी पडेल, याची शाश्वती उरलेली नाही. मुंबईतील ‘कॉल सेंटर’मध्ये काम करणारी भगिनी श्रद्धा वालकर आमच्या डोळ्यांदेखत ‘लव्ह जिहाद’ला बळी पडली आणि तिचे ३५ तुकडे करून फेकण्यात आले. तरीही आम्ही शांत बसलो. आमची ही शांतता म्हणजे आमची मूकसंमती असे जगाने गृहीत धरले आहे.

आमच्या डोळ्यांसमोर शासकीय भूमीवर अतिक्रमण करून बिनदिक्कत अवैध प्रार्थनास्थळे बांधली जात आहेत. अवैध प्रार्थना स्थळावरील भोंग्यांतून पहाटेपासून रात्रीपर्यंत, कानाचे पडदे फाटेपर्यंत आवाज होत आहे. तरीही आम्ही शांतच आहोत. आम्ही शांत म्हणून प्रशासनही शांतच आहे.

आज बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची आवश्यकता आहे. रोंहिग्यांची संख्या तर वाढतच आहे. ‘एन्.आर्.सी.’सारखा कायदा होणे आवश्यक आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. जगातील हिंदूंचे दायित्व आता आपल्यालाच घ्यावे लागणार आहे. देशात ‘समान नागरी कायदा’ आणण्याची आवश्यकता आहे. यासाठीच आता प्रशासनाला जाब विचारण्यासाठी, रत्नागिरीच्या सकल हिंदु समाजाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. किमान १० सहस्रांहून अधिक हिंदू या मोर्च्यात रस्त्यावर उतरतील, असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !