बिहारचे हिंदुद्वेषी शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांचा जावईशोध !
पाटलीपुत्र (बिहार) – आपण आज हिंदुत्वापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे. मंदिराचा मार्ग हा मानसिक गुलामगिरीचा आहे, तर शाळेचा मार्ग हा प्रकाशाचा आहे, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे आमदार आणि बिहारचे शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांनी एका कार्यक्रमात केले. प्रा. चंद्रशेखर यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार फतेह बहादूर सिंह यांच्या ‘अयोध्येत आता रामाचे मंदिर बांधले जात आहे. या मंदिरातून केवळ ढोंगी आणि मनुवादी समाजाचा विकास होऊ शकतो’ या विधानाचे समर्थनही केले. तसेच चंद्रशेखर यांनी ‘फतेह बहादूर यांच्या जीभेची आणि गळ्याची किंमत सांगणार्यांनी एक लक्षात ठेवा की, आता ते एकलव्याप्रमाणे बलीदान देणार नाहीत, तर बलीदान घेतील’, अशी धमकीही दिली. (एक शिक्षणमंत्री अशा प्रकारची धमकी देतो, हे लोकशाहीच्या तथाकथित रक्षणकर्त्यांना मान्य आहे का ? – संपादक)
सौजन्य : इंडिया टूडे
(म्हणे) ‘मंदिरांमध्ये केवळ शोषण होते !’
मंत्री चंद्रशेखर पुढे म्हणाले की, तुम्हाला दुखापत झाली, तर तुम्ही मंदिरात जाणार कि रुग्णालयात? त्याचप्रमाणे आपल्याला ज्ञान मिळवायचे असेल, शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हायचे असेल, तर विद्यालयात जावे लागेल. त्यासाठी मंदिरात जाऊन चालणार नाही. खरेतर मंदिरांमध्ये शोषण होते. राम हा तुमच्यात, माझ्यात आणि प्रत्येकात आहे, मग आपण त्याला शोधायला कुठे जाणार ? (ज्याच्यामध्ये राम आहे, तो अशा प्रकारचा द्वेष कदापि करणार नाही. ज्याच्यामध्ये रावण वृत्ती आहे, तोच मंदिरांविषयी अशी विधाने करील, असेच लोकांना वाटेल ! – संपादक) देवाची स्थळे म्हणून ज्या जागा ठरवण्यात आल्या आहेत, तिथे केवळ शोषण होते. या स्थळांद्वारे कुठल्या ना कुठल्यातरी समाजातील काही ठराविक लोक षड्यंत्र रचून स्वतःचे खिसे भरण्याचे काम करतात. (जगभरातील असंख्य चर्चमध्ये पाद्रयांकडून लहान मुले, महिला आदींचे लैंगिक शोषणे केले जात असल्याच्या सहस्रो घटना उघडकीत आल्या आहेत. मदरशांमध्येही लैंगिक शोषण केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. यांविषयी चंद्रशेखर यांचे बोलण्याचे धाडस होत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक)
Bihar's Anti-Hindu education Minister, Prof. Chandrashekhar's messed up advice.
Temples are a path to 'Mental Slavery', while schools mean the path of light in life. – Prof. Chandrashekhar.
👉 Will Prof. Chandrashekhar mind sharing his two cents of wisdom on what path does… pic.twitter.com/eP8R3iJ86B
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 8, 2024
संपादकीय भूमिका
|