(म्हणे) ‘दुर्गादेवी असे काही नसून ती एक काल्पनिक गोष्ट आहे !’ – आमदार फतेह बहादूर सिंह, राष्ट्रीय जनता दल

श्री दुर्गादेवीला ‘काल्पनिक’ संबोधून स्वतःला महिषासुराचे वंशज म्हणवणार्‍यांच्या राजवटीत बिहारमधील सर्वसामान्य जनता किती भरडली जात असेल ?, याचा विचारच न केलेला बरा ! यावरून हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट होते !

पॅलेस्टाईनवरील आक्रमण थांबवण्यासाठी इस्रायलवर दबाव आणण्याची  विरोधी पक्षांची घातक मागणी !

भारतातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली पॅलेस्टाईनच्या भारतातील राजदूतांची भेट !
इस्रायली लोकांवर केलेल्या आक्रमणांविषयी अवाक्षरही नाही !

(म्हणे) ‘पावडर’ आणि ‘लिपस्टिक’ लावलेल्या स्त्रियांनाच होणार महिला आरक्षणाचा लाभ !’ – राजदचे नेते अब्दुल बारी सिद्दीकी

स्वतःच्या धर्मातील महिलांना बुरख्यामध्ये ठेवणार्‍यांना असेच वाटणार, यात काय आश्‍चर्य ? महिलांचा अशा प्रकारे अनादर करणार्‍या आणि त्यांच्या क्षमतेवर प्रश्‍न उपस्थित करणार्‍या सिद्दीकी यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी !

बिहारचे शिक्षणमंत्री आणि राजदचे नेते चंद्रशेखर यादव यांनी महंमद पैगंबर यांना म्हटले ‘मर्यादा पुरुषोत्तम’ !  

या जगात ‘मर्यादा पुरुषोत्तम’ केवळ एकच आहेत आणि ते म्हणजे भगवान श्रीराम ! मुसलमानांच्या मतांसाठी अशी विधाने करणार्‍यांचा वैध मार्गाने विरोध झाला पाहिजे !

(म्हणे) ‘सनातन धर्म म्हणजे एच्.आय.व्ही. आणि कुष्ठरोग !’ – द्रमुकचे खासदार ए. राजा

दलित आणि मागासवर्गीय यांची परंपरागत मते मिळवण्यासाठी द्रमुकचे नेते जाणीवपूर्वक अशा प्रकारची टीका करत आहेत, हे लक्षात घेऊन धर्माभिमानी हिंदूंनी याला संघटितपणे विरोध केला पाहिजे !

बिहारचे मंत्री तेज प्रताप यादव यांनी कार्यकर्त्याचा गळा पकडून दिला धक्का !

कार्यकर्त्यार्ने दारू पिऊन धक्काबुक्की केल्याचा यादव यांचा दावा !

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राचा अर्थ आहे देशाला नरकात पाठवणे !’ – शिवानंद तिवारी, राष्ट्रीय जनता दल

‘इस्लामी राष्ट्र म्हणजे स्वर्ग’ असे तिवारी यांना म्हणायचे आहे का ? ते भारताला इस्लामी देश बनवण्याच्या आतंकवाद्यांच्या ध्येयाविषयी कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘श्रीरामचरितमानस’ हे मशिदीमध्ये लिहिण्यात आले होते !’ – राष्ट्रीय जनता दलाचे आमदार रीतलाल यादव

यादव अन्य धर्मियांचा धर्मग्रंथ मंदिरात लिहिण्यात आला होता, असे म्हणण्याचे धाडस करू शकणार नाहीत; कारण त्याचे परिणाम काय होतील, हे त्यांना ठाऊक आहे !

राष्ट्रीय जनता दलाने शवपेटीशी केली नवीन संसद भवनाची तुलना !

विरोधाला विरोध करण्यासाठी नकारात्मकतेचे टोक गाठणारा राजद पक्ष ! अशांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच !

(म्हणे) ‘एकही ब्राह्मण भारतीय नाही, तर ते रशियाहून आले !’ – बिहारच्या राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार

राजदच्या नेत्याने ब्राह्मणद्वेषातून केलेले विधान ! अशी विधाने करून हिंदूंमध्ये फूट पाडू पहाणार्‍या राजकारण्यांना हिंदूंनी ते मिळतील तेथे जाब विचारावा !