Muslims Reservation : मुसलमानांना ‘पूर्ण’ आरक्षण मिळालेच पाहिजे ! – लालू प्रसाद यादव

धर्माच्या आधारवर आरक्षण असू शकत नाही ! – विरोध होऊ लागल्यावर स्पष्टीकरण

डावीकडे लालू प्रसाद यादव

पाटलीपुत्र / देहली – राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी ७ मेच्या सकाळी मुसलमानांच्या आरक्षणावर मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, मुसलमानांना पूर्ण आरक्षण मिळायला हवे. तसेच जनतेला समजले आहे की, पंतप्रधान मोदी राज्यघटना आणि लोकशाही नष्ट करू इच्छित आहेत. त्यांच्या या वक्तव्याला विरोध होऊ लागल्यावर त्यांनी कोलांटउडी घेत काही तासांनंतरच म्हटले की, आरक्षण हे धर्माच्या आधारावर नाही, तर सामाजिक आधारावर दिले जाते. मंडल आयोगाच्या शिफारसी मीच लागू केल्या होत्या.

मुसलमानांना पूर्ण आरक्षण मिळाले पाहिजे, या यादव यांच्या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, ‘इंडी’ आघाडी राज्यघटनेच्या मूळ ढाच्यात पालट करून मुसलमानांना आरक्षण प्रदान करील. तसेच लालू प्रसाद यादव यांच्या ‘पूर्ण आरक्षणा’च्या वक्तव्याचा अर्थ हा आहे की, ते अनुसूचित जाती-जमाती यांच्या वाट्याला आलेले आरक्षणही मुसलमानांनाच देतील.

संपादकीय भूमिका 

  • स्वत:च्या वक्तव्यांशीच निष्ठा न ठेवणारे राजकीय नेते कधीतरी देश आणि जनता यांच्याशी एकनिष्ठ राहू शकतील का ?
  • संपूर्ण हयात ही अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यातच गेल्याने आता हे लोक पुन्हा निवडून आल्यास ‘हिंदूंना कायदा आणि मुसलमानांना फायदा’ याचे अत्यंत भयावह धोरण आखतील, हे जाणा !