चंपाई सोरेन झारखंडचे १२ वे मुख्यमंत्री !

झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन

रांची (झारखंड) – आर्थिक गैरव्यवहारामध्ये गुंतल्याचा आरोप असणारे हेमंत सोरेन यांनी त्यागपत्र दिल्यावर चंपाई सोरेन हे झारखंडचे १२ वे मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांनी २ फेब्रुवारीच्या दुपारी त्यांना शपथ दिली. या वेळी चंपाई यांच्यासह काँग्रेसचे आलमगीर आलम आणि राष्ट्रीय जनता दलाचे सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. सरकारला १० दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागेल.

राज्याच्या स्थापनेपासून नेहमीच अस्थिर राहिलेले झारखंडचे राजकारण !

१. बिहारपासून वर्ष २००१ मध्ये वेगळे झालेल्या झारखंडचे राजकारण नेहमीच अस्थिर राहिले आहे.

२. तेथे २३ वर्षांत ११ वेळा मुख्यमंत्री पालटले आहेत.

३. अर्जुन मुंडा आणि शिबू सोरेन प्रत्येकी ३ वेळा मुख्यमंत्री झाले, तर रघुवर दास हे एकमेव मुख्यमंत्री होते, ज्यांनी त्यांचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.

संपादकीय भूमिका

  • यावरून झारखंडची शासनव्यवस्था ही भारतीय लोकशाहीला कलंकच असल्याचे म्हणता येईल !