बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार अजय यादव यांचा दावा !

पाटलीपुत्र (बिहार) – भाजप २२ जानेवारीसाठी अयोध्येत मोठी गर्दी करत आहे. आम्हाला भीती आहे की, भाजप स्वतःच्या लोकांकडून येथे बाँबस्फोट घडवून आणेल आणि त्याचे खापर पाकिस्तानी आतंकवादी यांच्यावर फोडेल. ‘मुसलमानांनीच हे केले’, असे सांगेल, असे वक्तव्य बिहारमधील अतरी मतदारसंघाचे राष्ट्रीय जनता दलाचे आमदार अजय यादव उपाख्य रंजीत यादव यांनी केले.
सौजन्य एबीपी गंगा
अजय यादव पुढे म्हणाले की, आम्ही जो कररूपाने जे पैसे देत आहोत, ते श्रीराममंदिरासाठी खर्च करून भाजप स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. (श्रीराममंदिरासाठी सरकारचा नाही, तर हिंदूंनी अर्पण केलेला पैसा खर्च होत आहे, हे यादव यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक) भाजप म्हणतो, ‘आम्ही राममंदिर बनवले आहे.’ भाजपने स्वतःच्या घरून पैसा आणला आहे का ?, असा प्रश्नही यादव यांनी विचारला.
संपादकीय भूमिका
|
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !