ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची केंद्र सरकारची माहिती : विरोधकांची टीका !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्ण दगावल्याची अनेक प्रकरणे प्रसारमाध्यमे आणि अन्य स्रोत यांद्वारे पुढे आली. त्यामुळे जनतेसाठी हा संवेदनशील विषय आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेसमध्ये २ गट पडले आहेत ! – काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप

काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपवर जोरदार टीका करतांनाच त्यांनी अनेकदा महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवरही सडकून टीका केली आहे.

देशाची जिहादी आतंकवादी संघटनांनीही जेवढी हानी केली नाही तेवढी गांधी परिवाराने केली ! – चित्रपट निर्माते अशोक पंडित

स्वतःच्या लाभासाठी गांधी परिवाराने काश्मीरमधील जिहादी आतंकवादाला खतपाणी घातले. आणीबाणी लागू केली. त्याच्या काळात नक्षलवाद फोफावला.

राहुल गांधी यांच्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्याने त्यांचा आभारी आहे ! – आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांची उपरोधिक टीका

हिमंत सरमा यांनी सांगितलेला प्रसंग खरा असेल, तर काँग्रेसमध्ये गांधी घराण्याकडून पक्षाच्या नेत्यांचा किती मान राखला जातो, हे स्पष्ट होते !

बंगाल निवडणुकीचे युद्ध !

आज केवळ आणि केवळ हिंदुहिताचा पक्ष जनतेला हवा आहे. बंगालमधील हिंदूंच्या हत्या सत्रावर सत्तापालट हे उत्तर असेल, तर तो अवश्य होऊ दे; मात्र सत्तापालट होऊनही हिंदूंच्या हत्या होतच राहिल्या, तर त्यापेक्षा हिंदूंचे दुर्दैव काहीही नसेल !

सद्दाम हुसेन आणि गद्दाफी हेही निवडणुका जिंकत होते; पण तेथे लोकशाही होती, असे नाही ! – राहुल गांधी यांची केंद्रातील भाजप सरकारवर टीका

विदेशी विश्‍वविद्यालयाने ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘भारतात लोकशाही नाही’, असे चित्र उभे करून भारताची मानहानी करणारे राहुल गांधी !

गोध्रा हत्याकांडाप्रकरणी नरेंद्र मोदी क्षमा मागतील का ? – नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

राहुल गांधी यांनी चुकीविषयी क्षमा मागितली, ही चांगली गोष्ट आहे; मात्र काँग्रेसने केलेल्या चुकीविषयी जर खरोखरच त्यांना पश्‍चात्ताप वाटत असेल, तर त्यासाठी काँग्रेस काय प्रायश्‍चित्त घेणार ? हेही त्यांनी सांगणे अपेक्षित आहे.

राहुल गांधी यांच्या विरोधातील याचिकेवर भिवंडी न्यायालयात १५ मे या दिवशी सुनावणी

जाहीर सभेत ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली’, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती झाल्याचा आरोप करून संघाच्या एका स्थानिक नेत्याने राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली.

राहुल गांधी यांच्या भाषणाच्या वेळी मुसलमानांनी उपस्थित रहाण्यासाठी इमामाकडून फतवा !

काँग्रेससाठी अशा प्रकारचे किती फतवे काढण्यात आले, तरी आता काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे !

धर्मनिरपेक्ष धर्मांधांचे काँग्रेसप्रेम जाणा !

मकराना (राजस्थान) येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या किसान महापंचायतमध्ये होणार्‍या भाषणासाठी मोठ्या संख्येने मुसलमानांनी उपस्थित रहावे, असा फतवा येथील सुन्नी जामा मशिदीचे इमाम समसुद्दीन कादरी यांनी शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी काढला होता.