राहुल गांधी यांच्या विरोधातील याचिकेवर भिवंडी न्यायालयात १५ मे या दिवशी सुनावणी

ठाणे – खासदार राहुल गांधी यांनी वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात भिवंडीतील एका जाहीर सभेत ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली’, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती झाल्याचा आरोप करून संघाच्या एका स्थानिक नेत्याने राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली. या याचिकेवर सुनावणी होती; मात्र ती पुढे ढकलण्यात आली असून आता याचिकेवर १५ मे या दिवशी सुनावणी होणार आहे.