हिंदु शेतकर्‍यास मारहाण करणार्‍या धर्मांधाचा श्रीराम सेना नांगनूर शाखेकडून निषेध !

या प्रकरणी पोलिसांनी नगरसेवक शेरू बडेगर यांच्यासह ५ जणांवर निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून शेरू बडेगर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

‘मंगलम् कापूर’च्या विज्ञापनाद्वारे प्रभु श्रीरामाचा अवमान !

हिंदूंमधील धर्माभिमानशून्यतेमुळेच कुणीही उठतो आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अनादर करत सुटतो, हे लक्षात घ्या ! ही हिंदूंची सहिष्णुता नसून निवळ मूर्खपणा आहे, हे जाणा !

‘बीबीसी मराठी’च्या इन्स्टाग्राम खात्यावर व्यंगचित्र प्रसारित करून हिंदूंना धार्मिकतेच्या नावाखाली हिंसाचारी दाखवले !

बीबीसी सातत्याने हिंदूद्वेषाचा कंड शमवून घेण्यासाठी विविध प्रयत्न करत असते, त्यातीलच हे एक नवीन उदाहरण ! हिंदु संघटनांनी याविषयी केंद्र सरकारकडे  तक्रार करून बीबीसीवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करायला हवा !

‘पेटा’सारख्या संस्थांवर भारत सरकारने नियमित पाळत ठेवायला हवी ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वाेच्च न्यायालय

‘पेटा’ने तमिळनाडू येथे हत्तींचे संचलन (परेड) थांबवून त्यांचा धार्मिक कार्यात वापर करणे थांबवले. नागपंचमीला नागांच्या पूजेला विरोध केला. जन्माष्टमीला गायीच्या दुधाचा वापर करण्यास विरोध केला….

शिवसेना आणि हिंदुराष्ट्र सेना यांच्या प्रयत्नांमुळे दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेरील हनुमान मंदिरावरील कारवाईला रेल्वे प्रशासनाकडून स्थगिती !

दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाच्या बाहेरील पुरातन मारुति मंदिर अनधिकृत असल्याचे घोषित करून रेल्वे प्रशासनाकडून ते पाडण्यात येणार होते. त्याविषयी ३१ जुलै या दिवशी रेल्वे प्रशासनाकडून मंदिराच्या विश्‍वस्तांना नोटीस पाठवून ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती.

वेल्लोर (तमिळनाडू) येथे लसीकरण शिबिरासाठी आलेल्या पथकातील महिला ख्रिस्ती डॉक्टरकडून मंदिरात चपला घालून प्रवेश !

मुसलमानांच्या मशिदीमधील नियम तोडण्याचे ख्रिस्ती महिला डॉक्टर धारिष्ट्य करू शकतेे का ? हिंदूंच्या मंदिरात चपला घालून प्रवेश करण्याचे धाडस हिंदू धर्माभिमानशून्य असल्याने केले जात येऊ शकते, हे लक्षात घ्या !

कराची (पाकिस्तान)येथे श्री गणपति मंदिराच्या तोडफोडीच्या विरोधात हिंदूंची निदर्शने !

भगवे झेंडे हातात धरून ‘जय श्रीराम’ आणि ‘हर हर महादेव’च्या दिल्या घोषणा !

देहली येथे ‘हज हाऊस’ बांधण्याला हिंदुत्वनिष्ठ आणि गावकरी यांनी आंदोलन करून दर्शवला विरोध !

देशातील अनेक ठिकाणी हज हाऊस बांधले असतांना आणि आता हजला जाणार्‍या भारतियांच्या संख्येत कपात करण्यात आली असतांना हज हाऊसची काय आवश्यकता आहे ?

हज हाऊसचा प्रस्ताव रहित करा !

देहलीतील द्वारका भागातील आम आदमी पक्षाच्या सरकारकडून हज हाऊससाठी ७ सहस्र चौरस मीटर भूमी देण्यात आली आहे. तसेच सरकार त्याच्यावर १०० कोटी रुपये खर्च करणार आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याला विरोध केला आहे.

तमिळनाडूतील मंदिरांना वाली कोण ?

आज मात्र तमिळनाडू राज्याचे चित्र वेगळे आहे. तेथील आधुनिक ‘गझनी’रूपी राजकारण्यांच्या हिंदुविरोधी भूमिकेमुळे तमिळनाडूतील मंदिरे आणि संस्कृती यांचा र्‍हास होत चालला आहे……