रायपूर (छत्तीसगड) महानगरपालिकेने श्री गणेशमूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेल्याचा आणि विसर्जनस्थळी त्या फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघड !

आतापर्यंत अनेक ठिकाणी श्री गणेशाचा अशा प्रकारे अवमान होऊनही एकालाही कठोर शिक्षा झालेली नाही, हे लक्षात घ्या ! यासाठी हिंदूंनी संघटित होऊन संबंधितांना कायदेशीर शिक्षा होण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करा !

(म्हणे) ‘कन्यादान नको, कन्यामान म्हणा !’

हिंदूंचे धर्मशास्त्र, तसेच प्रथा आणि परंपरा यांच्यावर आघात करून हिंदूंचा बुद्धीभेद करू पहाणार्‍या आस्थापनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकणे आवश्यक !

सायंती घोष डिजायनर स्टुडिओ आस्थापनाकडून देवतांची चित्रे असणार्‍या कपड्यांची ऑनलाईन विक्री

हिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारे अवमान करणार्‍या कपड्यांवर बंदी घातली पाहिजे ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने असे कपडे घातल्याने धार्मिकता वाढत नाही, तर धर्माचा अवमान होतो, हे हिंदूंच्या लक्षात येत नाही !

मैसुरू (कर्नाटक) येथील महादेवम्मा मंदिर पाडल्याच्या विरोधात विहिंप आणि बजरंग दल यांचे सरकारच्या विरोधात आंदोलन !

भाजप सत्तेवर असलेल्या राज्यात मंदिरे पाडली जाणे आणि त्याच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आंदोलन करावे लागणे अपेक्षित नाही !

इंदूर येथे ‘अनिवार्य’ संस्थेने बसवलेल्या श्री गणेशमूर्तीच्या हातात ‘सॅनिटरी नॅपकीन’ ठेवून महिलांमध्ये जागृती करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

हिंदूंना आतापर्यंत हिंदूंच्या संघटना, धार्मिक संघटना, धर्मगुरु आदींनी धर्मशिक्षण न दिल्याचाचा हा परिणाम आहे. अन्य धर्मियांना धर्मशिक्षण मिळत असल्याने ते कधीही स्वतःच्या श्रद्धास्थानांचा अवमान करत नाहीत उलट कुणी प्रयत्न केला, तर थेट कायदा हातात घेतात !

फेसबूकवर गणपति आणि डॉ. आंबेडकर यांचे आक्षेपार्ह चित्र ‘पोस्ट’ करणार्‍यावर ठाणे येथे गुन्हा नोंद !

हिंदू धर्माभिमानशून्य असल्यानेच त्यांच्या श्रद्धास्थानांचे वारंवार विडंबन होते, हे लक्षात घ्या ! मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याध्ये स्वधर्माविषयी अभिमान असल्याने कुणी सहजासहजी त्यांच्या धार्मिक भावना दुखावत नाही.

मंदिरातील पवित्र नौकेमध्ये बूट घालून छायाचित्रे काढल्याच्या प्रकरणी मल्ल्याळम् अभिनेत्रीला अटक आणि सुटका

हिंदूंच्या धार्मिक स्थळी बूट घालून छायाचित्रे काढल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मल्ल्याळम् दूरचित्रवाहिन्यांवरील अभिनेत्री निमिषा बीजो आणि त्यांची मैत्रिण उन्नी यांना अटक केली आहे. त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले.

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेला अमेरिका आणि कॅनडा येथील हिंंदूंच्या १५० संस्थांचा विरोध !

हिंदुविरोधी कार्यक्रमांच्या विरोधात तत्परतेने संघटित होऊन कृतीशील होणारे विदेशातील हिंदू कुठे आणि हातावर हात ठेवून गप्प बसणारे भारतातील कोट्यवधी सामान्य हिंदू कुठे ?

‘जागतिक’ हिंदुत्वाला संपवण्याचा डाव !

गेल्या साधारण ३ आठवड्यांपासून ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या नावाने जागतिक (?) स्तरावर आयोजित एका कार्यक्रमाचा प्रचार करण्यात येत आहे. या माध्यमातून ‘हिंदुत्व’ हा जगाला धोका आहे’, असे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मल्लपूरम् (तमिळनाडू) येथील श्रीथलसायाना पेरूमल या प्राचीन मंदिराच्या शेजारी शौचालये बांधण्याचा घाट !

मंदिरांचे सरकारीकरण करून मनमानी पद्धतीने त्यांच्यासंदर्भात निर्णय घेणार्‍या  तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा निषेध ! तमिळनाडूतील हिंदूंनी या विरोधात संघटितपणे आणि वैध मार्गाने लढा उभारणे आवश्यक !