हिंदु शेतकर्‍यास मारहाण करणार्‍या धर्मांधाचा श्रीराम सेना नांगनूर शाखेकडून निषेध !

टायर जाळून निषेध व्यक्त करतांना श्रीराम सेना नांगनूर शाखेचे कार्यकर्ते, शेतकरी, तसेच अन्य

निपाणी (कर्नाटक), २९ ऑगस्ट – २७ ऑगस्ट या दिवशी येथील आंबा मार्केट येथे भाजीपाला विक्री करण्यासाठी आलेले हिंदु शेतकरी सुशांत कडाकणे यांना वाहन समोर आल्याचे कारण पुढे करून नगरसेवक शेरू बडेघर आणि त्यांचे साथीदार यांनी अमानुषपणे मारहाण केली. या प्रकरणी श्रीराम सेना नांगनूर शाखेकडून निषेध सभा घेऊन हिंदु शेतकर्‍यास मारहाण करणारे शेरू बडेघर यांचा धर्मवीर संभाजीराजे चौकात ‘टायर’ जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

या वेळी श्रीराम सेना बेळगाव जिल्हा सचिव श्री. अमोल चेंडके म्हणाले, ‘ही घटना अतिशय निंदनीय असून यातील संशयितांना अधिकाधिक शिक्षा व्हावी. लोकांचा अन्नदाता असलेल्या शेतकर्‍यास मारहाण करणे अत्यंत अयोग्य असून या नगरसेवकाचा बाजारपेठेतील गाळा नगरपालिकेने काढून घ्यावा आणि त्याचे नगरसेवकपद रहित करावे.’’ या प्रसंगी श्री. विवेक गुरव, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील पोवार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या निषेध सभेसाठी शेतकरी बांधव, श्रीराम सैनिक, विविध तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रकरणी पोलिसांनी नगरसेवक शेरू बडेगर यांच्यासह ५ जणांवर निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून शेरू बडेगर यांना पोलिसांनी अटक केली आहे.