‘पेटा’ने तमिळनाडू येथे हत्तींचे संचलन (परेड) थांबवून त्यांचा धार्मिक कार्यात वापर करणे थांबवले. नागपंचमीला नागांच्या पूजेला विरोध केला. जन्माष्टमीला गायीच्या दुधाचा वापर करण्यास विरोध केला. रक्षाबंधनाच्या दिवशी गायीचे पोस्टर लावून त्यावर ‘मला वाचवा’, ‘माझ्या कातडीचा वापर करू नका’, असे लिहिलेले होते. याला हिंदूंनी विरोध केल्यावर ‘पेटा’ने क्षमा मागितली. दुसरीकडे ‘पेटा’ आस्थापन हलाल मांसाचे समर्थन करते. ‘पेटा’सारख्या संस्थांवर भारत सरकारने नियमित पाळत ठेवायला हवी !’